दादा लढवय्ये, लवकर बरे व्हा, सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांना सदिच्छा

महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छा यांच्या बळावर कोरोना आजाराला पराभूत करुन लवकरच सर्वांच्या सोबत येतील, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या

दादा लढवय्ये, लवकर बरे व्हा, सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांना सदिच्छा
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 2:33 PM

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली असून मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर दादा लवकर बरे व्हा, अशा सदिच्छा त्यांच्या चुलत भगिनी आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिल्या आहेत. (NCP MP Supriya Sule wishes speedy recovery to cousin Ajit Pawar who tested COVID Positive)

“अजितदादा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल झाले आहेत. दादा लढवय्ये आहेत. महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छा यांच्या बळावर कोरोना आजाराला पराभूत करुन लवकरच सर्वांच्या सोबत येतील. दादा,लवकर बरे व्हा” असे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यावेळी ती निगेटिव्ह आली होती. मात्र कणकण आणि ताप असल्याने ते घरीच थांबून विश्रांती घेत होते. रुटीन चेकअपसाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात गेले असता त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर ते रुग्णालयात अॅडमिट झाले. (NCP MP Supriya Sule wishes speedy recovery to cousin Ajit Pawar who tested COVID Positive)

माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे, अशी माहिती अजित पवारांनी ट्विटरवरुन दिली होती.

राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन, असेही त्यांनी सांगितले.

अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा

अजित पवारांनी शनिवारी 18 ऑक्टोबरला अतिवृष्टी झालेल्या बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी केली होती. अजित पवारांनी शनिवारी सकाळी बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पंढरपूरमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

संबंधित बातम्या : 

मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह

अजित पवारांनी दौरे टाळले, कणकण आणि ताप आल्याने घरीच विश्रांती, कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

(NCP MP Supriya Sule wishes speedy recovery to cousin Ajit Pawar who tested COVID Positive)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.