Sharad Pawar | चर्चा पवारांच्या यूपीए चेअरमनपदाची, पण ते प्रत्यक्षात बोलले कशावर?

येत्या काही काळात शरद पवार यूपीएचे अध्यक्ष होतील, अशा बातम्या गुरुवारी दिवसभर माध्यमांमध्ये येत होत्या.

Sharad Pawar | चर्चा पवारांच्या यूपीए चेअरमनपदाची, पण ते प्रत्यक्षात बोलले कशावर?
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 2:27 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष होतील, अशा चर्चांना कालपासून उधाणं आलं होतं. मात्र, आज शरद पवार त्याविषयी काहीही न बोलता त्यांनी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर आपलं मत व्यक्त केलं. याविषयी त्यांनी केंद्र सरकारला शेतकऱ्यांविषयी लवकर निर्णय घेण्याच्या सूचनाही केल्या (Sharad Pawar Ignore To Talk On UPA Chairperson News).

यावेळी शरद पवार यूपीए अध्यक्षाबाबतच्या चर्चेवर काही बोलतील अशी शक्यता होती. मात्र, शरद पवारांनी त्याविषयी काहीही न बोलणं पसंत केलं.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

“शेतकऱ्यांच्या या सर्व ज्या मागण्या आहेत, त्याच्यामध्ये मुख्यत: तीन शेतकरी बिलाबाबत आहेत. या तिनही बिलांसंबंधी संसदेत जेव्हा ही बिलं आली, त्यावेळी सगळ्यांच्या वतीने सांगण्यात आलं की, घाईघाईने इतक्या महत्त्वाचे तीन कायदे चर्चा न करता मंजूर करणं, हे आज जरी तुम्हाला शक्य असलं, तरी उद्या तुम्हाला त्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून निघाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून तुम्ही घाई करु नका. पण सरकारने विरोधकांची सूचना ऐकली नाही आणि तिनही कायदे अक्षरश: 15 ते 20 मिनिटांत मंजूर करुन घेतले”, असं शरद पवारांनी सांगितलं.

“आज त्यासंबंधीची टोकाची मागणी शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांनी सांगितलं की, तुम्ही हा कायदा मागे घ्या आणि मग त्यावर आपण शहानिशा करु, चर्चा करु, पण सरकारने ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे हा संघर्ष आणखी काही दिवस चालेल, अशा प्रकारची चिन्ह सध्या दिसत आहेत. आज आणखी काही शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. जर आताच दिल्लीत या आंदोलनाला थांबवलं नाही. तर पंजाबच्या शेतकरी आंदोलनाचं लोन देशात अन्य ठिकाणी पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही”, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली

त्यामुळे माझी भारत सरकारकडे आग्रहाची विनंती आहे की, “शेतकरी देशाचा अन्नदाता आहे, या अन्नदात्याच्या सहनशिलतेचा तुम्ही अंत पाहू नका”.

Sharad Pawar Ignore To Talk On UPA Chairperson News

शरद पवार यूपीएचे अध्यक्ष होतील?

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्यासाठी शरद पवार यांच्या पाठीमागे काँग्रेस खंबीरपणे उभी आहे. येत्या काही काळात शरद पवार यूपीएचे अध्यक्ष होतील, अशा बातम्या गुरुवारी दिवसभर माध्यमांमध्ये येत होत्या. मात्र या बातमीचं खंडन करत यामध्ये तथ्य नसल्याचं स्वत: शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्रातला कित्ता दिल्लीतही गिरवला जावा आणि केंद्रामधलं सरकार सत्तेच्या खाली खेचावं, हे सगळं प्लॅनिंग पवारांकडे देण्याचं नियोजन सोनिया यांचं असल्याचं बोललं गेलं. मात्र “या सगळ्या चर्चा आहेत. यूपीएच्या अध्यक्षपदाच्या संदर्भामध्ये कोणतंही तथ्य नाही”, असं दस्तुरखुद्द शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं विरोधक एकत्र येताना दिसत आहेत. याच विरोधी पक्षांचं नेतृत्व शरद पवार करणार असल्याच्या बातम्या दिवसभर माध्यमांधून देण्यात आल्या. मात्र UPA चं प्रमुखपद मी स्वीकारणार असल्याच्या चर्चा तथ्यहीन आहेत, असं पवार म्हणाले.

Sharad Pawar Ignore To Talk On UPA Chairperson News

संबंधित बातम्या :

शरद पवारांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार व्हावे, काँग्रेसची गळ?

पवारांनी जो चमत्कार महाराष्ट्रात केला, तो देश पातळीवर करतील?; समजून घ्या 12 पॉईंटमधून!

सगळीकडे पवारांच्या यूपीए चेअरमनपदाची चर्चा; पण काँग्रेस काय म्हणतेय?

शरद पवार आधी यूपीएचे चेअरमन होणार, नंतर पंतप्रधान? कोण काय म्हणतंय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.