Sharad Pawar : राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता वाटत नाही, पण लागली तर निवडणुका होतील : शरद पवार
शिंदे यांना नवं सरकार हवं आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते भेटले. आम्ही आघाडी सरकार स्थापन केलं. त्याला सहयोग देण्याचा निर्णय घेतला. आज आमची आघाडी आहे आणि ती कायम राहील. बंडखोरांना या ठिकाणी पर्यायी सरकार आणायचं आहे.
नवी दिल्ली : राष्ट्र्वादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिल्लीत आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी बंडखोरी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. शिंदे यांना नवं सरकार हवं आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते भेटले. आम्ही आघाडी सरकार स्थापन केलं. त्याला सहयोग देण्याचा निर्णय घेतला. आज आमची आघाडी आहे आणि ती कायम राहील. बंडखोरांना या ठिकाणी पर्यायी सरकार (Alternative Government) आणायचं आहे. एवढ्या मेहनतीने त्यांनी लोकं इथून तिथे नेली. त्यात त्यांना यश कसे येईल. माझा अंदाज असा आहे की खात्रीशीर माहिती नाही. राष्ट्रपती राजवटीची शक्यता वाटत नाही. पण राष्ट्रपती राजवट (Presidential Rule) लागली तर निवडणुका होतील, असे शरद पवारांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंचा अखेरीस विजय होईल
उद्धव ठाकरेंनी कामातून संबंधातून पक्षाच्या चौकटीतून आमदारांशी संबंध ठेवले. पण त्यापेक्षाही आकर्षक गोष्टीचं प्रलोभन या आमदारांना दिलं असावं. त्यामुळे ते बळी पडले. मला जी शिवसेना माहीत आहे, ती शिवसेना शिवसैनिक या गोष्टी कधी डायजेस्ट करणार नाही. त्यांच्यात प्रचंड ताकद आहे. संघटनेसाठी पडेल ते कष्ट घेण्याची ताकद आहे. काही चाळीस एक लोकांनी वेगळी भूमिका घेतली असेल तरी शिवसेनेवर काही परिणाम होणार नाही. मला वाटतं यात उद्धव ठाकरेंचा अखेरीस विजय होईल, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.
…तर आमदारांनाही व्हीप लागू होतो
लोकांना असं वाटतं जो व्हीप दिला तो हाऊसमध्ये व्हायलेट केला तर पक्षांतरबंदी कायद्यात येतो. व्हीप दिल्यानंतर हाऊसमध्ये त्याचा भंग केला तरच त्यांच्यावर कारवाई होते असं आम्हाला वाटत होतं. पण सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आला आहे. आमदारांनी विधानसभा किंवा संसदेच्या बाहेर पक्षाच्या विरोधात स्टेटमेट दिलं किंवा पाऊल उचललं तर त्यांनाही व्हीप लागू होतो. या लाईनवर शिवसेना जाईल. मी सांगतो तसा निर्णय व्यंकय्या नायडूंनी घेतला आणि कोर्टाने मान्य केला. (NCP President Sharad Pawars Statement on Presidential Rule and Elections)