भाजप-शिवसेना वादात राष्ट्रवादीची उडी, ‘घड्याळ’ पुन्हा ‘टायमिंग’ साधणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आणि शिवसेनेत (NCP Shiv Sena) तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांची आजची बैठक रद्द झाली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आणि शिवसेनेत (NCP Shiv Sena) तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांची आजची बैठक रद्द झाली आहे. मीच पुन्हा मुख्यमंत्री असेल, शिवसेनेला NCP Shiv Sena) मुख्यमंत्रीपदावरुन कोणताही शब्द दिला नव्हता, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे दोन्ही पक्षात धुसफूस सुरु झाली आहे.
अशा परिस्थितीत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा टायमिंग साधण्याच्या तयारीत आहे. कारण भाजपने डावलल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आता शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. जर भाजपने सेनेला डावललं तर राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देईल, असं राष्ट्रवादीचे नेते खासगीत बोलत आहेत. मात्र राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाव मलिक यांनी आपण विरोधातच बसणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे राष्ट्रवादीची नेमकी भूमिकाच गुलदस्त्यात ठेवली आहे.
राष्ट्रवादीच्या पवित्र्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी रंगत आली आहे. यापूर्वी राष्ट्रवादीने 2014 मध्येही सत्तास्थापनेच्या राजकारणात टायमिंग साधली होती. त्यावेळी चौथ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीने भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे शिवसेनेचं महत्त्व आपसूक कमी झालं होतं.
मात्र यंदा शरद पवारांनी आम्ही विरोधात बसू पण भाजपला पाठिंबा देणार नाही अशी भूमिका घेतली. पण राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेला पाठिंबा देऊ अशी भूमिका घेत असल्याने, नवा ट्विस्ट आला आहे.
पृथ्वीराज चव्हाणही रेडी
शिवसेनेकडून काँग्रेस राष्ट्रवादीला प्रस्ताव आल्यास आमच्या पक्षश्रेष्ठीशी संपर्क साधून, आवश्य सत्ता स्थापनेसाठी विचार करेल, असं काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजप- शिवसेना यांच्यात सत्ता स्थापनेवरून चर्चा सुरू असून महाराष्ट्रातील जनतेला ताटकळत ठेऊ नये, असाही सल्ला चव्हाण यांनी दिला आहे.
संबंधित बातम्या
अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता : मुख्यमंत्री
मीच मुख्यमंत्री, आदित्यला काय ते शिवसेना ठरवेल, मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची 10 विधाने
मुख्यमंत्री म्हणाले 50-50 ठरलंच नाही, संजय राऊत यांनी ‘तो’ व्हिडीओच लावला
मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानानंतर शिवसेना-भाजपची बैठक रद्द