विरोधकांनी राजकीय टीका टाळा, राज्याला पुरेशा लसी मिळण्यासाठी केंद्राला एखादं पत्र लिहा, रोहित पवारांचा सल्ला

राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील यासाठी केंद्राला एखादं पत्र लिहावं, असा सल्ला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे. (Rohit Pawar Tweet for enough corona vaccines)

विरोधकांनी राजकीय टीका टाळा, राज्याला पुरेशा लसी मिळण्यासाठी केंद्राला एखादं पत्र लिहा, रोहित पवारांचा सल्ला
Rohit Pawar
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 1:05 PM

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. यावर विरोधकांनी केवळ राजकीय टीका न करता राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील यासाठी केंद्राला एखादं पत्र लिहावं, असा सल्ला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे. रोहित पवारांनी ट्वीट करत विरोधकांवर निशाणा साधला. (NCP Rohit Pawar Tweet About Opposition to Write a letter get for enough corona vaccines)

रोहित पवारांचे ट्वीट

“कोविडच्या लढ्याबाबत पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचं कौतुक केलं, त्यामुळं राज्यातील विरोधकांनी केवळ राजकीय टीका न करता राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्रालाही जरुर लिहावं!” असे ट्वीट रोहित पवारांनी केले आहे.

“कोविडच्या मृतांची आकडेवारी लपवण्याबाबत बोलायचं तर आज हे भाजपशासित राज्यांना सांगण्याची खरी गरज आहे. कोविडचा हा लढा संपलेला नाही. त्यामुळं राजकीय टीका-टिप्पणी टाळून सर्वांनाच हा लढा एकत्रित लढावा लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न करुयात!” असेही रोहित पवार म्हणाले.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच 

राज्यात काल दिवसभरात 53 हजार 605 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर त्याचवेळी 82 हजार 266 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण कोरोनामुक्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे राज्यासाठी हा खूप मोठा दिलासा आहे. मुख्य म्हणजे यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 6 लाख 28 हजार 213 इतका खाली आला आहे.

–  राज्यात काल दिवसभरात 864 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद – सध्या राज्यातील करोना मृत्यूदर 1.49% एवढा आहे. – आज राज्यात 53 हजार 605 नवीन रुग्णांचे निदान. – आज 82 हजार 266 रुग्ण बरे होऊन परतले घरी. – आजपर्यंत एकूण 43,47,592 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. – राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 86.03 % एवढे – अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 6 लाख 28 हजार 213

राज्यात कोरोना लसीचा तुटवडा 

राज्यात एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना दुसरीकडे कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. देशभरात 1 मे पासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे 45 वयाच्या पुढील नागरिकांचे कोरोना लसीकरण केले जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे काही ठिकाणी कोरोना लसीकरणे केंद्र बंद ठेवली जात आहे. या सर्व कारणांमुळे केंद्र सरकारने कोरोना लसींचा योग्य पुरवठा करावा, अशी मागणी केली जात आहे.  (NCP Rohit Pawar Tweet Opposition to Write a letter get for enough corona vaccines)

संबंधित बातम्या : 

केंद्राने देशाची जाहीर माफी मागावी, आरोग्य मंत्री राजीनामा द्या; चिदंबरम यांची मागणी

Corona Pandemic : कोरोनापासून लढण्यासाठी DRDO च्या आणखी एका औषधाला मंजुरी, कसं ठरतं उपयुक्त?

आदित्य ठाकरेंना मंत्रिपद दिलंत, तसं बहुजनांचं पालकत्व स्वीकारा, पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना बोचरं पत्र

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.