मुंबई: संजय राठोड प्रकरण आणि आता शिवसेना नेते अरविंद सावंत यांच्यावर आगपाखड करणाऱ्या भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी चांगलेच फैलावर घेतले. रूपाली चाकणकर यांनी ट्विट करत भाजपची बाजू लावून धरणाऱ्या महिल्या नेत्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. यामध्ये त्यांनी चित्रा वाघ आणि नवनीत राणा यांना लक्ष्य केले. (Rupali Chakankar slams BJP over GST refund from central govt)
महाराष्ट्राचा स्वाभिमान असणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई यांच्या नावाचा वापर करून तुम्ही ज्यांना पाठीशी घालत आहात त्यांना एकच प्रश्न विचारा चित्रा वाघ की, तुम्ही गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या हक्काचा GST निधी मिळवण्यासाठी काय प्रयत्न केले, असे ट्विट रुपाली चाकणकर यांनी केले.
महाराष्ट्रात राहुन शासनाधिकृत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न करता अनधिकृत अशा PM Care Fund ला मदत केली जे आज हिशोब मागितला तरी द्यायला तयार नाहीत यापेक्षा मोठा महाराष्ट्रद्रोह होऊच शकत नाही, असेही रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्राचा स्वाभिमान असणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई यांच्या नावाचा वापर करून तुम्ही ज्यांना पाठीशी घालत आहात त्यांना एकच प्रश्न विचारा चित्रा वाघ की आज तुम्ही गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या हक्काचा GST निधी मिळवण्यासाठी काय प्रयत्न केले ,
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) March 23, 2021
महाराष्ट्रात राहुन शासनाधिकृत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न करता अनधिकृत अशा PM Care Fund ला मदत केली जे आज हिशोब मागितला तरी द्यायला तयार नाहीत यापेक्षा मोठा महाराष्ट्रद्रोह होऊच शकत नाही @NCPspeaks @TV9Marathi @zee24taasnews @MiLOKMAT @saamTVnews @abpmajhatv @LoksattaLive
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) March 23, 2021
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh Letter) यांच्या लेटरबॉम्बचे पडसाद सोमवारी लोकसभेत उमटलेले पाहायला मिळाले. याच मुद्द्यावरून शिवसेना-भाजपचे खासदार एकमेकांना भिडले. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंनीही (Supriya Sule) देखील आक्रमक भूमिका मांडली. परंतू या सगळ्यात खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आक्रमक भूमिका घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट (President Rule) लागू झाली पाहिजे, अशी मागणी केली. त्यांच्या याच मागणीवर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) चांगल्याच भडकलेल्या पाहायला मिळाल्या.
नवनीतजी राणा आपल्याला जर नैतिकतेचा एवढा पुळका आला असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा. तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जीवावर खासदारकी मिळाली आहे. त्यामुळेच आज तुम्हाला लोकसभेत तुमची भूमिका मांडता आली, याकडे रुपाली चाकणकर यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
संबंधित बातम्या:
लोकसभेत नवनीत राणा, गिरीश बापट आक्रमक; ठाकरे सरकारच्या बचावासाठी पंजाबचा खासदार मैदानात
(Rupali Chakankar slams BJP over GST refund from central govt)