Devendra Fadnvis | तिन्ही पक्षाचं सरकार पक्षवाढीसाठी कसं वापरायचं हे पवारांना चांगलंच माहिती : देवेंद्र फडणवीस
महाविकास आघाडीला वर्ष पूर्ण झालं. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने सरकारच्या कामगिरीची पोलखोल करण्यासाठी मुंबईतील भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे (Sharad Pawar) मातब्बर नेते आहेत. तिन्ही पक्षाच्या सरकारचं स्वताच्या पक्षवाढीसाठी कस वापरायचं हे त्यांना चांगल माहितंय, असं विधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) म्हणाले. महाविकास आघाडीला (MVA Government) वर्ष पूर्ण झालं. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने सरकारच्या कामगिरीची पोलखोल करण्यासाठी मुंबईतील भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. ncp sharad pawar is a big leader all three parties know how to use the for their own party said opposition leader Devendra Fadnavis
फडणवीस काय म्हणाले?
“नुकसान कोणाचं झालंय, हे त्यांनी त्यांनी ठरवावं. पण सगळयात जास्त नुकसान या सरकारमुळे महाराष्ट्राचं अर्थात जनतेचं झालंय. पवार साहेब अत्यंत मातब्बर नेते आहेत. या सर्व 3 पक्षीय युतीचा उपयोग आपल्या पक्षवाढीसाठी कसा करायचा हे त्यांना नीट माहितीये. त्यामुळे ते योग्य तो उपयोग करतायेत”, असं फडणवीस म्हणाले.
Press conference at @BJP4Maharashtra Office, Mumbai https://t.co/MKOosax2b8
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 28, 2020
“बांधावर शेतकऱ्यांना दिलेल्या वचनाचं काय”
अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी रुपयांची घोषणा केली. मात्र, यातील एक रुपयाचीही मदत अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. त्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना बांधावर जाऊन दिलेल्या वचनाचं काय? असा सवाल देवेद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केलाय. तसंच भाजपनं मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेला वचन दिलं होतं. हे शिवसेनेकडून सातत्यानं सांगितलं जातं. ते वचन मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आहे. पण शेतकऱ्यांना दिलेलं वचन ते विसरले, अशी टीकाही फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
संबंधित बातम्या :
देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल, थेट उद्धव ठाकरेंवर 10 बोचरे वार
ncp sharad pawar is a big leader all three parties know how to use the for their own party said opposition leader Devendra Fadnavis