Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीरमची आग अपघात की घातपात?, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

सीरमच्या आगीची घटना हा अपघातच असावा, असं म्हणत घातपाताचा संशय शरद पवारांनी फेटाळून लावला. 

सीरमची आग अपघात की घातपात?, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 10:44 AM

कोल्हापूरकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला गुरुवारी आग लागली होती. काही तासांनी ही आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं. मात्र आगीनंतर अनेकांनी ही आग लावली की लागली?, अशा संशयास्पद कमेंट व्यक्त केल्या. यामध्ये राजकीय पक्षांचे नेतेही पाठीमागे नव्हते. सीरमच्या आगीवरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  यांना विचारण्यात आलं. यावेळी त्यांनी आगीच्या घातपाताची शक्यता स्पष्ट शब्दात फेटाळून लावली. (NCp Sharad pawar on Serum Institute Fire pune)

सीरमच्या आगीबाबत भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनी शंका व्यक्त केली. हा घातपाताचा प्रकार तर नाही ना असा प्रश्न मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांनी उपस्थित केला. मुक्ता टिळक यांच्या शंकेनंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही हीच शंका व्यक्त केली. त्यानंतर अनेकांनी घातपातीची शक्यता दबक्या आवाजात व्यक्त केली.

मात्र या सगळ्या चर्चा केवळ चर्चाच आहेत. यामध्ये तथ्य नसल्याचं अप्रत्यक्षपणे पवारांनी सांगितलं. सीरम इन्सिट्यूटच्या स्टाफवर माझा संपूर्णपणे विश्वास आहे. आगीची घटना हा अपघातच असावा, असं म्हणत घातपाताचा संशय शरद पवारांनी फेटाळून लावला.

घातपाताची शक्यता- आ. मुक्ता टिळक

दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग ही आघपात तर नाही ना, अशी शंका भाजपच्या आमदार मुक्ता टिकळ यांनी व्यक्त केली होती. कोरोनाचं संकट अद्याप कायम आहे. त्यात कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचा इमारतीलाच ही आग लागल्यानं हा घातपात तर नाही ना, अशी शंका त्यांनी व्यक्त केलीय.

आग लागली की लावली?, चौकशी झाली पाहिजे- प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली होती. यादरम्यानच त्यांना सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीबाबत माहिती मिळाली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली हे मलाही व्हॉट्सअॅप मेसेज आणि सोशल मीडियावरुन समजलं. पण ही आग लागली आहे की लावलेली आहे याची चौकशी झाली पाहिजे”

(NCp Sharad pawar on Serun Institute Fire pune)

हे ही वाचा

Serum institute Fire : आधी मुक्ता टिळक म्हणाल्या घातपाताचा संशय, आता प्रकाश आंबेडकर म्हणतात आग लागली की लावली?

Serum Institute Fire Live | कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला भीषण आग 

Serum Institute Fire : सीरमच्या आगीमागे घातपाताची शंका, भाजप आमदाराकडून संशय व्यक्त 

VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक.
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं....
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक.
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?.