Mohit Kamboj: “आधी घोषणा होते, मग ईडी कारवाई करते”, मोहित कंबोजांच्या ट्विटवरून महाविकास आघाडीचा भाजपविरोधात एकसूर

भाजप नेते मोहित कंबोज सध्या राष्ट्रवादीवर निशाणा साधून आहेत. काल तीन ट्विटमधून इशारा दिल्यानंतर विरोधकांनी त्यांच्याविरोधात आवाज एकवटला आहे.

Mohit Kamboj: आधी घोषणा होते, मग ईडी कारवाई करते, मोहित कंबोजांच्या ट्विटवरून महाविकास आघाडीचा भाजपविरोधात एकसूर
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 12:38 PM

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamb0j) सध्या राष्ट्रवादीवर निशाणा साधून आहेत. काल तीन ट्विटमधून इशारा दिल्यानंतर आजही त्यांनी दोन ट्विट करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. तर आता विरोधकांनी (Mahavikas Aghadi) कंबोज यांच्याविरोधात आवाज एकवटला आहे. आधी घोषणा होते, मग ईडी कारवाई करते. याचा अर्थ तपास यंत्रणांवर भाजपचा वचक आहे, असं महाविकास आघाडीतील नेत्यांचं म्हणणं आहे. सध्या राज्यात ईडी अॅक्टिव्ह आहे. विरोधीपक्षातील नेते त्यांच्या निशाण्यावर आहेत. नुकतंच शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना ईडीने अटक केली. त्यानंतर नेक्स्ट कोण? याचं उत्तर भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी भविष्यवाणी करणाऱ्या ट्विटमधून दिलंय. “माझं हे ट्विट सेव्ह करुन ठेवा! अनिल देखमुख, नवाब मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे. लवकरच हा नेता मलिक, देशमुखांच्या भेटीला जाणार आहे. तेव्हा जेलवारीसाठी तयार राहा!”, असं सूचक इशारा देणारं ट्विट मोहित कंबोज यांनी केलंय.

छगन भुजबळ म्हणाले

ज्यांची चौकशी होणार आहे, त्यांची नावं आधी भाजपचे नेते जाहीर करतात आणि मग तपास यंत्रणा कामाला लागतात, असा उलटा कारभार सुरु आहे,असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणालेत.

हे सुद्धा वाचा

पटोलेंचं प्रत्युत्तर

मविआचा कुठलाही नेता भाजपच्या धमक्यांना घाबरत नाही. ईडी सरकारची उलटी गिनती सुरु झाली आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नान पटोले म्हणाले आहेत.

दानवेंचा सवाल

ईडीची वारंवार भिती दाखवली जाते. भाजपचं ईडी चावलतं हे आता स्पष्ट आहे. मोहित कंबोज काय ईडीचा अधिकारी आहे काय? साधा कार्यकर्ता असा दावा करत असेल. तर ईडी भाजपच्या दबावाखाली काम करत आहे, असं शिवसेना नेते अंबादास दानवे म्हणाले आहेत.

कायंदेंचा भाजपला सवाल

केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या कार्यालयातून चालवल्या जातात का? त्यांना आधीच सगळी माहिती कशी मिळते. सगळ्या तपास यंत्रणांवर भाजपचा वचक आहे, असं शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी म्हटलंय.

कंबोज यांची चौकशी करा- मिटकरी

राष्ट्रवादीचे नेते, विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलंय. मोहित कंबोज कोण आहे? हा भाजपचा भोंगा आहे. जीएसटी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का हे बोलत नाहीत? मोहित कंबोजची देखील चौकशी झाली पाहिजे. ईडी आधी कुठे धाड ताकत असेल जर त्याला माहित असेल तर मग त्याची चौकशी झाली पाहिजे. असल्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही,असं मिटकरी म्हणालेत.

वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.