सुप्रिया सुळेंच्या फोन आणि व्हॉट्सॲप हँकिंगप्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर

सुप्रिया सुळे यांचा मोबाईल हॅक करणाऱ्याने तब्बल 400 डॉलरची केली आहे. यानंतर त्यांच्या स्वीय सहाय्यक महिलेने याबद्दल तक्रार नोंदवली होती.

सुप्रिया सुळेंच्या फोन आणि व्हॉट्सॲप हँकिंगप्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर
Follow us
| Updated on: Aug 14, 2024 | 8:28 AM

Supriya Sule Mobile Hack : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा दोन दिवसांपूर्वी मोबाईल आणि व्हॉट्सॲप हॅक झाले होते. सुप्रिया सुळे यांचा मोबाईल हॅक करणाऱ्याने तब्बल 400 डॉलरची मागणी केली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती. आता याप्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सुप्रिया सुळेंचे व्हॉट्सॲप हॅक झाल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सुप्रिया सुळेंचे व्हॉट्सॲप हॅक झाल्यानंतर त्यांच्या स्वीय सहाय्यक महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली होती. स्वीय सहाय्यक महिलेच्या तक्रारीनंतर आता यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी यवत ग्रामीण पोलीसांनी माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे.

सुप्रिया सुळेंचा फोन आणि व्हॉट्सॲप हॅक झाल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून याचा तपास केला जात आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे. सुप्रिया सुळे यांचा मोबाईल हॅक करणाऱ्याने तब्बल 400 डॉलरची केली आहे. यानंतर त्यांच्या स्वीय सहाय्यक महिलेने याबद्दल तक्रार नोंदवली होती. यानंतर याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी याबाबत सोशल मीडियाचालक कंपनीशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांच्या सोशल मीडियातील खात्याचे नियंत्रण हॅकरकडून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

सुप्रिया सुळे यांचे ट्वीट

सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन रविवारी दुपारी 1 च्या सुमारास एक ट्वीट केले होते. या ट्वीटद्वारे त्यांनी फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाल्याचे सांगितले. “अत्यंत महत्वाचे – माझा फोन आणि व्हॉटसॲप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करु नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी”, असे सुप्रिया सुळे यांनी ट्वीटमध्ये म्हटले होते.

दरम्यान सुप्रिया सुळे यांनी दौंडमध्ये केलेल्या भाषणादरम्यान त्यांचा फोन नेमका कसा हॅक झाला, याबद्दल सांगितले होते. “मी बराच वेळ माझ्या फोनवर व्यस्त होते. याचं कारण माझा फोन हॅक झाला. माझा फोन माझ्यासोबत इतर कोणीतरी ऑपरेट करत आहे. मी जेव्हा इथे आले तेव्हा माझ्या हे लक्षात आले. या ठिकाणी आल्यावर माझं व्हॉट्सॲप सुरुच होत नव्हतं. मी जयंत पाटील यांना नमस्कार मेसेज करा असे सांगितले. त्यांनी तो मेसेज केल्यानंतर मी फोनवर काहीही न करता त्यांना समोरुन नमस्कार असा मेसेज आला. यानंतर मी माझा फोन बंद केला, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.