दसरा मेळाव्यावरून ठाकरे-शिंदेगटात वाद, सुप्रिया सुळे म्हणाल्या…
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेना आणि शिंदेगट यांच्यात दसरा मेळाव्यावरून चाललेल्या वादावर भाष्य केलंय.
योगेश बोरसे, पुणे : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदेगट यांच्यात दसरा मेळाव्यावरून चाललेल्या वादावर भाष्य केलंय. दसरा मेळाव्यावरून राजकारण दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. “आम्ही जेव्हा शिवसेनेच्या विरोधात होतो. तेव्हाही शिवसेनेच्या बाबतीत असं कधीही केलं नाही. शिवसेनेचा भव्य मेळावा व्हायचा. आम्हीही तो उत्सुकतेनं पहायचो. आमच्यावरती काय टिका करतात, याची आम्हाला उत्सुकता असायची, असं ,सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.