Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Presidential Election: राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शरद पवारांच्या नेतृत्वात दिल्लीत बैठक, 17 विरोधी पक्षांची बांधली मोट!

राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत इच्छुक नसल्याचे सांगत शरद पवार यांनी तमाम शंकांना विराम दिला असला तरी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतून त्यांनी अंग काढले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांच्यानंतर पवार यांनी 17 विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा निश्चिय केला आहे. त्यांच्या नेतृत्वात दिल्लीत २१ जून रोजी बैठक होत आहे.

Presidential Election: राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शरद पवारांच्या नेतृत्वात दिल्लीत बैठक, 17 विरोधी पक्षांची बांधली मोट!
शरद पवार यांच्या नेतृत्वात दिल्लीत बैठकImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 4:05 PM

राष्ट्रपती पदाच्या (Presidential Election)  निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोध गट सक्रिय झाले आहेत. विरोध गटाने या निवडणुकीत आघाडी घेतली असून त्यांची बैठकांची सत्र सुरुच आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी (Mamata Banerjee) यांच्यानंतर आता राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे विरोधकांचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी येत्या 21 जून रोजी राजधानी दिल्ली येथे बैठकीचे (Meeting at Delhi) आयोजन केले आहे. या बैठकीला 17 विरोधी पक्षांचे नेते हजर राहतील. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीला आप आणि बीजू जनता दलाने दांडी मारली होती. हे पक्ष आता या बैठकीला दांडी मारतात का? उपस्थित राहतात याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. त्यांची अनुपस्थिती ही विरोधकांतील फूट मानण्यात येईल आणि नाव घोषीत होण्यापूर्वीची ही फाटाफूट विरोधकांसाठी डोकेदुखी ठरणारी राहील. तर पवार या बैठकीतून काय व्युवरचना मांडतात आणि कोणत्या उमेदवाराच्या नावावर विरोधकाचं एकमत करण्यात यशस्वी ठरतात का हा या बैठकीतील कळीचा मुद्दा असेल.

दिल्लीत बैठकांचं सत्र

शरद पवार यांनी राजकारणातच सक्रिय राहण्याचा इरादा बोलून दाखवल्यानंतर आता राष्ट्रपती उमेदवार निवडीसाठी ते सक्रिय झाले आहे. विरोधी पक्षांची मोट बांधत त्यांना 21जून रोजी बैठकीला बोलावलं आहे. बॅनर्जी यांनीच पुढील बैठकीत नव्या उमेदवाराच्या नावाची चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे दिल्लीत होणा-या विरोधकांच्या या बैठकीकडे सत्ताधा-यांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे. पवार यांच्या नेतृत्वात विरोधक कोणाचे नाव पुढे करतात, यावर पुढील रणनिती ठरणार आहे. विरोधकांची एकाच नावावर सहमती करण्याचे कौशल्य पवारांना दाखवावं लागणार आहे. राजकारणातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते म्हणून त्यांच्या नेतृत्वातील ही बैठक निर्णायकी ठरेल असा कयास लावण्यात येत आहे. तर दुसरीकडे पवार त्यांचे पत्ते शेवटच्या क्षणापर्यंत उघडे करत नसल्याने या बैठकीनंतरही परिस्थिती काही और असू शकते, असे ही तज्ज्ञांचे मत आहे.

चौघांचे फुटीचे चौघडे

दरम्यान भाजपला पश्चिम बंगालमध्ये पराभव दाखवणा-या ममता बॅनर्जी यांनी नुकतीच दिल्लीत बैठक आयोजीत केली होती. त्याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा, डीएमके, शिवसेना, राष्ट्रीय जनता दल, नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमॉक्रेटीक पार्टी आणि डाव्या पक्षांनी हजेरी लावली होती. पण आदमी पार्टी, तेलंगणा राष्ट्र समिती, शिरोमणी अकादील दल आणि बीजू जनता दल या बैठकीपासून चार हात दूर राहिले. या चौघांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने विरोधकांत फुटीचे चित्र दिसल्याची चर्चा रंगली. आता पवारांनी आयोजीत केलेल्या बैठकीला हे चार ही पक्ष उपस्थित राहतात की वेगळी भूमिका घेतात हे लवकरच स्पष्ट होईल.

भाजपचा सर्वसमंतीवर जोर

एकीकडे विरोधक राष्ट्रपती पदासाठी एका उमेदवारावर सर्वसमंतीचे प्रयत्न करत असताना सत्ताधारी भाजपने रोधकांसह सर्वांना राष्ट्रपती पदाचा उमेदवार सर्वसमंतीने देण्यासाठी गळ घातली आहे. त्यासाठी पक्षाने खास समितीची स्थापना ही केली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. 14 जणांची एक समिती भाजपनं त्यासाठी तयार केली असून भाजपने दिलेल्या उमेदवारावर विरोधकांचे ही एकमत करण्याची कसरत या समितीला करावी लागणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी अनेक राजकीय पक्षांशी फोनवरुन संवाद साधला आहे. राज्यात सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी ही त्यांनी संवाद साधला आहे. भाजपने आता सर्वांची मनधरणी सुरु केली आहे.