‘एकच वादा, अजित दादा’, मुख्यमंत्र्यांनी पवार कुटुंबावर टीका करताच घोषणा

पवार कुटुंबीयांवर केलेल्या टीकेला प्रत्त्युत्तर म्हणून कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्र्याचं भाषण सुरु असतानाच 'एकच वादा, अजित दादा' अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपलं भाषण आटोपतं (slogans in CM speech) घ्यावं लागलं.

'एकच वादा, अजित दादा', मुख्यमंत्र्यांनी पवार कुटुंबावर टीका करताच घोषणा
Follow us
| Updated on: Sep 14, 2019 | 8:24 PM

बारामती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा बारामतीत झालेल्या राड्यामुळे (slogans in CM speech) चांगलीच गाजली. पवार कुटुंबीयांवर केलेल्या टीकेला प्रत्त्युत्तर म्हणून कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्र्याचं भाषण सुरु असतानाच ‘एकच वादा, अजित दादा’ अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपलं भाषण आटोपतं (slogans in CM speech) घ्यावं लागलं. या सर्व गोंधळामुळे पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करत त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला.

बारामतीत झालेल्या महाजनादेश यात्रेच्या स्वागत सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे, खासदार अमर साबळे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थिती लावली. मुख्यमंत्र्यांची सभा होणार असल्याने सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही या ठिकाणी गर्दी केली होती.

सकाळीच या सभेच्या ठिकाणी लावलेल्या साऊंड सिस्टमवरून वाद निर्माण झाला होता. गणेशोत्सव, दहीहंडी अशा उत्सवावेळी साऊंड सिस्टम लावण्यास प्रतिबंध केला जातो. मग मुख्यमंत्र्यांच्या सभेलाच साऊंड सिस्टम लावण्यास परवानगी कशी असा सवाल करत गणेश मंडळासह गोविंदा पथकांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरलं. त्यामुळे पोलिसांना या ठिकाणची साऊंड सिस्टम हटवणं भाग पडलं. याचाच धागा पकडत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात बारामतीकरांनी आपला धसका घेतल्याचं म्हटलं. त्यानंतर त्यांनी आपल्या भाषणात पवार कुटुंबीयांना आणि राष्ट्रवादीला लक्ष्य केलं.

या दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘एकच वादा, अजित दादा’, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभेत काही काळ तणाव निर्माण झाला. कार्यकर्त्यांच्या घोषणा थांबत नसल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज करत त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला.

या सर्व प्रकारामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपलं भाषणही आटोपतं घ्यावं लागलं. पोलिसांनी केलेल्या लाठी चार्जमध्ये अनेक कार्यकर्त्यांना प्रसाद मिळाला. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी सभा संपल्यानंतरही घोषणाबाजी केली.

VIDEO : 

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.