अर्थमंत्री टाळ्यांवर जीएसटी लावतील या भीतीने लोक टाळ्या वाजवत नाहीत; नाथाभाऊंची तुफान बॅटिंग

अब्दुल सत्तार जरा घराबाहेर पडा. या अमरावतीत जा, मुक्ताईनगरमध्ये पावसाने मोठं नुकसान झालं आहे. ज्यांनी 12 अंकी डिजिटल नोंदणी केली असेल त्यांनाच 100 रुपयांची किट देणार आहे.

अर्थमंत्री टाळ्यांवर जीएसटी लावतील या भीतीने लोक टाळ्या वाजवत नाहीत; नाथाभाऊंची तुफान बॅटिंग
अर्थमंत्री टाळ्यावर जीएसटी लावतील या भीतीने लोक टाळ्या वाजवत नाहीतImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 21, 2022 | 5:16 PM

अमरावती: राष्ट्रवादीचे (ncp) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. अमरावतीत सभेला संबोधित करताना त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करतानाच केंद्र सरकारवरही टीका केली. नाथाभाऊंचं भाषण सुरू असताना टाळ्या पडल्या नाहीत. हाच धागा पकडत नाथाभाऊंनी यावेळी कोटी केली. अर्थमंत्री टाळ्यांवर जीएसटी (GST) लावतील या भीतीने लोक टाळ्या वाजवत नाहीत, अशी कोटी एकनाथ खडसे यांनी करताच एकच खसखस पिकली.

एकनाथ खडसे अमरावतीत सभेला संबोधित करत होते. दिवाळीच्या एका रात्रीत 18 टक्क्यांनी महागाई वाढवण्यात आली. जीएसटी लावण्यात आला. त्यामुळे लोकांमध्ये जीएसटीची भीती आहे. जीएसटी लावतीलया भीतीने लोक टाळ्या वाजवत नाहीत, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

आवाज उठवला की तुमच्यामागे ईडी, सीबीआय लागते. आता तर अशी कोणतीच यंत्रणा नाही की माझी चौकशी करत नाही. पण मी तुमच्या आशीर्वादाने मजबूत आहे, असं सांगतानाच ईडी चौकशी करत असताना एसीबीच्या चौकशीची गरज काय? असा सवाल त्यांनी केला.

विनाकारण मानसिक त्रास देत आहेत. नाथाभाऊ बोलतो म्हणून याचा आवाज बंद करण्याचा सरकारचा उद्देश आहे. भोसरीच्या प्रकरणात अनेकदा मी स्पष्टीकरण दिलं. त्या व्यवहाराशी माझा कुठलाही संबंध नाही. जाणीवपूर्वक माझा छळ करण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या पद्धतीच्या चौकशी करत आहे. एसीबीच्या माध्यमातून या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी झाली. चौकशीमध्ये काहीच आढळले नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मागे पुण्याच्या न्यायालयामध्ये सरकारच्या माध्यमातून क्लोजर रिपोर्ट सादर केला त्याला दोन वर्षे झाली. दोन वर्षे झाल्यानंतर आता सरकारला का जाग आली? सरकारने न्यायालयामध्ये अर्ज केला आणि यामध्ये त्यांना अधिक तपास करायचा आहे. नाथाभाऊची परत चौकशी करायची आहे. ज्या चौकशा करायच्या त्या करा, जेवढे मला छळायचे आहे तेवढे छळा. पण मी निर्दोष आहे, असं ते म्हणाले.

महाराष्ट्रामध्ये 70 वर्षात कधी झालं नाही, एवढ्या खालच्या पद्धतीने राजकारण सुरू आहे. 50 खोके सबकुछ ओके झालं आहे. मला मतदान करू नये म्हणून गिरीश महाजन देवेंद्र भुयार यांना फोन करत होते. काही आमदारांनी 50 खोके घेऊन मतदारसंघ विकून टाकला. ज्यांना आम्ही घडवतो, तेच आमच्या अंगावर बसतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

अब्दुल सत्तार जरा घराबाहेर पडा. या अमरावतीत जा, मुक्ताईनगरमध्ये पावसाने मोठं नुकसान झालं आहे. ज्यांनी 12 अंकी डिजिटल नोंदणी केली असेल त्यांनाच 100 रुपयांची किट देणार आहे. हे सरकार फार काळ टिकणार नाहीॉ. खोके घेऊन या सरकारची सुरुवात झाली आहे. पहिले पंधरा दिवस एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसच संसार करत होते. मंत्रिपदासाठी सर्वजण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. सरकारचं भवितव्य फार चांगलं आहे असं वाटत नाही. सर्वांनाच मंत्री व्हायचे आहे, असंही ते म्हणाले.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.