राष्ट्रवादीचा माढा लोकसभेचा उमेदवार जवळपास निश्चित

सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसने माढ्याचा उमेदवार निश्चित केल्याचं सांगण्यात येत आहे.  माढा मतदारसंघातून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  आज किंवा उद्या प्रभाकर देशमुख यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार आहे. प्रभाकर देशमुख माजी सनदी अधिकारी आहेत. माढा लोकसभेचे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना, प्रभाकर देशमुख यांच्या उमेदवारीची कुणकुण […]

राष्ट्रवादीचा माढा लोकसभेचा उमेदवार जवळपास निश्चित
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसने माढ्याचा उमेदवार निश्चित केल्याचं सांगण्यात येत आहे.  माढा मतदारसंघातून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  आज किंवा उद्या प्रभाकर देशमुख यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार आहे. प्रभाकर देशमुख माजी सनदी अधिकारी आहेत. माढा लोकसभेचे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना, प्रभाकर देशमुख यांच्या उमेदवारीची कुणकुण लागल्याने, मोहिते पाटील राष्ट्रवादीवर नाराज होते. त्यामुळेच विजयसिंह मोहिते पाटील यांनी खुद्द शरद पवारांना माढ्यातून निवडणूक लढण्याचा आग्रह केला होता. पवारांनीही आधी लढण्याची घोषणा केली, त्यानंतर त्यांनी माघार घेतली.

रणजितसिंह मोहिते पाटलांचा भाजप प्रवेश निश्चित?

या सर्व पार्श्वभूमीनंतर माढ्याचं तिकीट कुणाला मिळणार याबाबत उत्सुकता होती. अखेर राष्ट्रवादीकडून प्रभाकर देशमुख यांचं नाव निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे.

कोण आहेत प्रभाकर देशमुख ?

प्रभाकर देशमुख हे माजी सनदी अधिकारी आहेत

शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा प्रभाकर देशमुख त्यांचे सचिव होते

प्रभाकर देशमुख यांनी प्रशासनात विविध पदांवर काम केलं आहे

कडक शिस्तीचा अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.

जलयुक्त शिवार ही प्रभाकर देशमुख हे यांचीच संकल्पना असल्याचं सांगितलं जातं.

निवृत्तीनंतर प्रभाकर देशमुख यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये?

दरम्यान, विजयसिंह मोहिते पाटील यांचं तिकीट राष्ट्रवादी कापणार हे निश्चित झाल्याने, त्यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

रणजितसिंह मोहिते पाटलांचा उद्याच भाजप प्रवेश?

रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपप्रवेशावर शिक्कामोर्तब होणार आहे. उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपात प्रवेश करणार हे जवळपास निश्चित आहे. राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटलांची उमेदवारी जाहीर न झाल्याने मोहिते पाटील गट नाराज आहे. यासाठीच आज अकलूजमधील शिवरत्न बंगल्यावर आज निर्णायक बैठक होणार आहे. या बैठकीत याबाबतचा निर्णय होऊ शकतो. रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजप उमेदवारी देण्यास तयार आहे. भाजप प्रवेशापूर्वी समर्थकांशी चर्चा करण्यासाठी आज मोहिते पाटलांनी बैठक बोलावली आहे.

जर रजणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपने आणि प्रभाकर देशमुख यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली, तर इथे तगडी फाईट होईल.

संबंधित बातम्या 

रणजितसिंह मोहिते पाटलांचा भाजप प्रवेश निश्चित?

माढ्यात दुसरा भूकंप, रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या गळाला?  

नांदेडमधून अशोक चव्हाणच काँग्रेसचे उमेदवार?  

दाऊदचा प्रस्ताव शरद पवारांनी का नाकारला? : प्रकाश आंबेडकर  

रणजितसिंह मोहिते पाटलांचा भाजप प्रवेश निश्चित?   

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.