ताज्या सर्व्हेनुसार एनडीए बहुमताच्या जवळ, यूपीएला फक्त 135 जागा
नवी दिल्ली : बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर मोदी सरकारला खरंच फायदा होणार आहे का? तर याचं उत्तर हो असं आहे. कारण, टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरच्या ओपिनियन पोलमध्ये भाजप प्रणित एनडीए बहुमताच्या जवळ दिसत आहे. तर काँग्रेसप्रणित यूपीए मात्र 135 जागांवर अडकली आहे. 543 जागांपैकी एनडीएला 283, यूपीए 135 आणि इतर पक्षांचा 125 जागांचा अंदाज वर्तवण्यात […]
नवी दिल्ली : बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर मोदी सरकारला खरंच फायदा होणार आहे का? तर याचं उत्तर हो असं आहे. कारण, टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरच्या ओपिनियन पोलमध्ये भाजप प्रणित एनडीए बहुमताच्या जवळ दिसत आहे. तर काँग्रेसप्रणित यूपीए मात्र 135 जागांवर अडकली आहे. 543 जागांपैकी एनडीएला 283, यूपीए 135 आणि इतर पक्षांचा 125 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय. भाजपला सर्वात मोठा फटका उत्तर प्रदेशात बसताना दिसतोय. तर तामिळनाडूत एआयएडीएमकेला सोबत घेतल्याचाही फायदा झालेला दिसत नाही.
मार्च महिन्यात करण्यात आलेल्या या सर्व्हेमध्ये 16931 लोकांचा सहभाग होता. यापूर्वीच्या सर्व्हेमध्ये एनडीए बहुमतापासून दूर असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र तेव्हापासून दोन महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. केंद्र सरकारने सादर केलेलं अंतरिम बजेट आणि बालाकोट एअर स्ट्राईक. या पार्श्वभूमीवर या सर्व्हेला महत्त्व प्राप्त झालं आहे. तेलंगणा, केरळ या राज्यांमध्ये भाजप आणि काँग्रेसलाही फटका बसणार आहे. तर दिल्लीमध्ये सातपैकी सात जागा भाजप जिंकताना दिसत आहे.
राज्यनिहाय जागांचा अंदाज
महाराष्ट्र (48)
पक्ष 2019 2014
युती 39 42
आघाडी 09 06
उत्तर प्रदेश (80)
पक्ष 2019 2014
भाजप+ 42 73
काँग्रेस+ 02 02
सपा-बसपा+05 36
बिहार (40)
पक्ष 2019 2014
भाजप+ 27 30
काँग्रेस+ 13 10
ओदिशा (21)
पक्ष 2019 2014
भाजप 14 01
बीजेडी 07 20
काँग्रेस 00 00
पश्चिम बंगाल (42)
पक्ष 2019 2014
भाजप 11 02
टीएमसी 31 34
काँग्रेस 00 04
राजस्थान, मध्य प्रदेश (54)
पक्ष 2019 2014
भाजप 42 52
काँग्रेस 12 02
हरियाणा (10)
पक्ष 2019 2014
भाजप 08 07
काँग्रेस 02 01
INLD 00 02
पंजाब (13)
पक्ष 2019 2014
भाजप+ 00 06
काँग्रेस 12 03
आप 01 04
कर्नाटक (28)
पक्ष 2019 2014
भाजप 15 17
काँग्रेस 13 11
आंध्र प्रदेश (25)
पक्ष 2019 2014
भाजप 00 02
काँग्रेस 00 00
YSRCP 22 08
TDP 03 15
तामिळनाडू (39)
भाजप+ 05 39
काँग्रेस + 34 00