मुख्यमंत्र्यांचे दोन पीए, महाजनांचा स्वीय सहाय्यक आणि धनंजय मुंडेंचा पीएही निवडणुकीच्या रिंगणात?

यंदा या याद्यांमध्ये राजकीय नेत्यांसोबतच सरकारी बाबूंची (Netas PA in Maharashtra Assembly election) नावं दिसण्याची चिन्हं आहेत.

मुख्यमंत्र्यांचे दोन पीए, महाजनांचा स्वीय सहाय्यक आणि धनंजय मुंडेंचा पीएही निवडणुकीच्या रिंगणात?
Follow us
| Updated on: Sep 27, 2019 | 10:37 AM

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर, राजकीय पक्षांच्या उमेदवार याद्यांकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. यंदा या याद्यांमध्ये राजकीय नेत्यांसोबतच सरकारी बाबूंची (Netas PA in Maharashtra Assembly election) नावं दिसण्याची चिन्हं आहेत. महत्त्वाचं म्हणजे दिग्गज मंत्र्यांचे पीए (Netas PA in Maharashtra Assembly election) विधानसभा निवडणुका लढवण्याचे संकेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या खासगी सचिवांनी  विधानसभेची तयारी केली आहे.

मुख्यमंत्र्यांचे पीए

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव अभिमन्यू पवार यांचं नाव आधीपासूनच चर्चेत आहे. अभिमन्यू पवार हे लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची चिन्हं आहेत.

याशिवाय मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी अर्थात ऑफिसर्स ऑन स्पेशल ड्युटी ओमप्रकाश शेट्ये हे बीडमधून रणांगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. ओमप्रकाश शेट्ये हे मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसंदर्भातील काम पाहतात. भाजपकडून संधी मिळेल अशी आशा त्यांना आहे.

गिरीश महाजनांचे पीए

भाजपचे दिग्गज नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे खासगी स्वीय सहाय्यक रामेश्वर नाईक हे जळगावमधून लढण्याची चाचपणी करत आहेत. रामेश्वर नाईक हे ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा पुरवण्याचं काम करतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी अनेकांना वैद्यकीय मदत केली आहे.

संघाची पार्श्वभूमी असलेले रामेश्वर नाईक यांनी सरकारला राज्यभर मेडिकल कॅम्प घेण्यात मोठी मदत केली आहे. जवळपास 35 लाख रुग्णांची तपासणी या माध्यमातून झाली. नाईक यांनी अद्याप आपलं काहीही ठरलं नसल्याचं सांगितलं. मात्र पक्षाने आदेश दिला तर लढण्यास तयार आहे असंही त्यांनी डीएनए या वृत्तपत्राला सांगितलं.

धनंजय मुंडेंचे पीए महाजनांविरुद्ध मैदानात?

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे सहाय्यक मदन जाधव हे सुद्धा विधानसभा लढवण्याची शक्यता आहे. मदन जाधव यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून जळगावातील जामनेर मतदारसंघातून मैदानात उतरवण्याची चिन्हं आहेत. जाधव यांनी राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी मोर्चेबांधणी केल्याचं समजतंय.

सध्या गिरीश महाजन हे या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. मदन जाधव हे सुद्धा याच मतदारसंघातून तयारी करत आहेत. जर त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली तर इथली लढत लक्षवेधी ठरेल.

संबंधित बातम्या  

भाजपातून लढा किंवा शिवसेनेतून, औसा मतदारसंघात उमेदवार अभिमन्यू पवारच  

या पाच जागांवर युतीचं घोडं अडलं, मुख्यमंत्र्यांचे पीए वेटिंगवर 

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.