Narendra Modi : काँग्रेसला रिमोट सरकार चालवण्याची सवय, पंतप्रधान मोदींची टीका
देशाच्या जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला, आम्हाला निवडून दिलंय. 60 वर्षांनंतर असं झालयं की एखाद्या पक्षाचं सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आलं आहे. सहा दशकांनंतर घडलेली ही एक असामान्य घटना आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
देशाच्या जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला, आम्हाला निवडून दिलंय. 60 वर्षांनंतर असं झालयं की एखाद्या पक्षाचं सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आलं आहेसहा दशकांनंतर घडलेली ही घटना म्हणजे एक असामान्य घटना आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. काही लोक मुद्दाम तोंड फिरवून बसले होते. त्यांना समजलं नाही. ज्यांना समजले, त्यांनी देशातील जनतेच्या तर्कशुद्धतेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत गदारोळ माजवला. आमच्या सरकारला 10 वर्षे झाली, अजून 20 वर्षे बाकी आहेत. आमच्या सरकारचा एक तृतीयांश (कार्यकाळ) पूर्ण झाला आहे, दोन तृतीयांश बाकी आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले.
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला संबोधित केलं. त्यानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत उत्तर दिलं. पंतप्रधान मोदींनी काल लोकसभेत धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले होते.
संभ्रमाच्या राजकारणाला जनतेनं नाकारलं
देशवासीयांनी संभ्रमाचं, गोंधळाचं राजकारण नाकारलं असून विश्वासाचे राजकारण मान्य केले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. सार्वजनिक जीवनात माझ्यासारखे अनेक लोक आहेत ज्यांच्या कुटुंबातून कोणी सरपंचही झाले नव्हते, त्यांचा राजकारणाशी काही संबंधही नाही. पण आज ते महत्त्वाच्या पदावर पोहोचले आहेत. याचे कारण बाबासाहेबांनी दिलेले संविधान आहे. आमच्यासारखे लोक इथपर्यंत पोहोचण्याचे कारण म्हणजे संविधान आणि जनतेची त्याला दिलेली मान्यता. संविधान हा आपल्यासाठी केवळ काही लेखांचा संग्रह नाही, तर त्याचा आत्माही महत्त्वाचा आहे. संविधान हे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मार्गदर्शन करण्याचे काम करते. २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करू, असे आमच्या सरकारच्या वतीने लोकसभेत सांगण्यात आले, तेव्हा संविधानाची प्रत घेऊन उड्या मारणाऱ्यांनी त्याचा निषेध केला याचे मला आश्चर्य वाटले, असा टोला पंतप्रधानांनी लगावला.
आज आपण 75 व्या वर्षात पदार्पण करत असताना जनउत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील जनतेने आपल्याला तिसऱ्यांदा संधी दिली आहे, ती संधी विकसित भारताची आहे, स्वावलंबी भारताची ही वाटचाल स्वीकारून हा संकल्प पुढे नेण्याचा आशीर्वाद दिला आहे, असे मोदी म्हणाले.
देशातील जनतेचा आमच्यावर विश्वास
ही निवडणूक म्हणजे केवळ गेल्या 10 वर्षांच्या कामगिरीवर मंजुरीचा शिक्का नाही तर भविष्यातील धोरणांसाठीही मान्यता देणारा हा निकाल आहे. देशातील जनतेचा आमच्यावर पूर्ण विश्वास असल्याने आम्हाला संधी देण्यात आली आहे. गेल्या 10 वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेला 10 व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर नेण्यात यश आले आहे आणि जसजसा हा नंबर जवळ येत आहे, तसतशी आव्हानेही वाढत आहेत. कोरोनाचा कठीण काळ आणि जागतिक संघर्षाची परिस्थिती असतानाही आपल्या अर्थव्यवस्थेला 10 व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर नेण्यात यश आले आहे.
पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी मोठा गोंधळ माजवला. मात्र त्यांची घोषणाबाजी सुरू असतानाही पंतप्रधान मोदींनी भाषण सुरूच ठेवले.
काँग्रेसला रिमोट सरकार चालवण्याची सवय
काँग्रेसवर हल्लाबोल करताना पीएम मोदी म्हणाले की, त्यांनी ऑटो पायलट मोडवर सरकार चालवले आहे. काँग्रेसला ऑटो मोडचे सरकार हवे आहे. काँग्रेसला रिमोट सरकार चालवण्याची सवय आहे.