दिल्लीत NDA ची बैठक, अजित पवार उपस्थित राहणार?; तर बंगळुरुमध्ये विरोधी पक्षांची बैठक, शरद पवार उपस्थित राहणार

राजधानी दिल्ली एनडीएची बैठक होणार आहे. या बैठकीला अजित पवार उपस्थित राहणार का?, असा सवाल उपस्थित होतोय. तर बंगळुरुमध्ये विरोधकी पक्षांची बैठक होतेय. शरद पवार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

दिल्लीत NDA ची बैठक, अजित पवार उपस्थित राहणार?; तर बंगळुरुमध्ये विरोधी पक्षांची बैठक, शरद पवार उपस्थित राहणार
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 7:53 AM

मुंबई | 18 जुलै 2023 : लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना सत्ताधारी आणि विरोधकांनी मित्रपक्षांची मोट बांधायला सुरुवात केली आहे. राजधानी दिल्लीत आज NDA ची बैठक पार पडतेय. तर बिहारच्या पटनामध्ये विरोधकांची बैठक झाल्यानंतर आता आज बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांची बैठक पार पडतेय. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार आहेत. तर ठाकरेगटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कालच बंगळुरुत दाखल झाले आहेत.

एनडीएची बैठक

आज दिल्लीत सत्ताधाऱ्यांची अर्थातच एनडीएची बैठक पार पडतेय. या बैठकीला 38 पक्ष उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित असतील. तर नुकतंच भाजपसोबत गेलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार का? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

शिवाय LJP चे नेते चिराग पासवान, नुकतेच एनडीएमध्ये सहभागी झालेले सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे नेते ओमप्रकाश राजभर, हिंदुस्तानी अवाम मोर्चा, राष्ट्रीय लोक जनता दलाचे उपेंद्र कुशवाहा, पवन कल्याण यांच्या नेतृत्वातील जनसेना या एनडीएच्या बैठकीत सहभागी होणार आहे.

एनडीएच्या या बैठकीच्या शिवाय विरोधी पक्षांचीही बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात रणनिती ठरवली जाणार असल्याची माहिती आहे.

विरोधी पक्षांची बैठक

काँग्रेसच्या अध्यक्षतेखाली आज विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. कर्नाटकातील बंगळुरुत ही बैठक पार पडतेय. या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. आज या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सहभागी होणार आहेत. तर या बैठकीच्या पहिल्या दिवशी म्हणजे काल संध्याकाळी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांचं स्नेहभोजन झालं. यात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या 20 मिनिटे विविध विषयांवर चर्चाही झाली.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, जेडीयूचे नेते, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, डीएमकेचे प्रमुख, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन, RJD चे प्रमुख लालू प्रसाद यादव हे सहभागी झाले होते.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव, नेशनल कॉन्फ्रेंसचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला, पीडीपीच्या नेत्या महबूबा मुफ्ती यादेखील सहभागी झाल्या होत्या.

विरोधी पक्षांची बिहारमधल्या पटनामध्ये याआधी बैठक पार पडली. त्यानंतर आता बंगळुरुत ही बैठक पार पडतेय. या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.