पहिली दोन निरिक्षणं ‘या’ गटाच्या बाजूने; महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकालाच्या वाचनाला सुरूवात

Supreme Court Result Maharashtra Political conflict : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकालाच्या वाचनाला सुरूवात; पाहा सर्वोच्च न्यायलयाची तीन महत्वाची निरीक्षणं

पहिली दोन निरिक्षणं 'या' गटाच्या बाजूने; महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकालाच्या वाचनाला सुरूवात
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 12:43 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आज लागतो आहे. या निकालाच्या वाचनाच्या वेळी सर्वोच्च न्यायलयाने काही महत्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत. राज्यातील सत्ता संघर्षाचं प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने दोन निरीक्षणं ठाकरेगटाच्या बाजूने नोंदवली आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याच्या निर्णयामुळे ठाकरेगटाच्या अडचणी वाढल्या आहेत.

राज्यातील सत्ता संघर्षाचं प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने दहा प्रश्न तयार करून हे प्रकरण सात न्यायाधीशाच्या लार्जर बेंचकडे सोपवण्याचा निर्णय दिला आहे. यात कोर्टाने निरीक्षणं नोंदवली आहेत.

राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

बहुमत चाचणी पक्षांतर्गत वादासाठी हत्यार म्हणून वापरू शकत नाही. राज्यपालांकडे कोणतेही ठोस पुरावे नव्हते. राज्यपाल यांनी बहुमत चाचणी बोलवायला नको होती, असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे

खरी शिवसेना कोण याचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे असेल. खरी शिवसेना कोण याचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

गोगावले यांची निवड चुकीची

शिवसेना पक्षाचा व्हीप म्हणून गोगावले (शिंदे गटाचा पाठिंबा असलेले) यांची नियुक्ती करण्याचा सभापतींचा निर्णय बेकायदेशीर आहे. कोणताही गट अपात्रतेच्या कारवाईच्या बचावासाठी मूळ पक्ष असल्याचा युक्तिवाद करू शकत नाही. दहाव्या शेड्यूल अंतर्गत विभाजनाचा बचाव आता उपलब्ध नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

ठाकरेंचा राजीनामा मोठी अडचण

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर कोर्टाने सरकार परत आणलं असतं असं सरन्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने ठाकरे गट अडचणीत आला आहे.

16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षाकडेच राहणार आहे. जुनं सरकार आणण्याची शक्यता कोर्टाने फेटाळली आहे. निर्णय घेण्यासाठी मोठ्या 7 न्यायाधीशांचे खंडपीठाकडे देण्यात येईल, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....