नवी दिल्ली : देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बाब समोर आली आहे. कॉंग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्यावर लोकसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई केली आहे. राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. सूरत कोर्टाने त्यांना दोषी ठरविल्यानंतर त्याचा आधार घेत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत असून यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून यामध्ये ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया देत मोठं विधान केले आहे. यामध्ये राहुल गांधी यांना फायदा होईल की नाही माहिती नाही मात्र भाजपला फायदा होणार की तोटा याबाबत स्पष्ट मत मांडलं आहे.
राहुल गांधी यांच्यावरील कारवाईचा निषेध व्यक्त करत खासदार अरविंद सावंत यांनी लोकशाहीची मूल्य जपण्यासाठी राहुल गांधी यांच्यासोबत राहणार असल्याचे म्हंटले आहे. यामध्ये राहुल गांधी यांच्यावरील कारवाई योग्य नसल्याचे म्हंटले आहे.
राहूल गांधी यांच्यावरील कारवाई लोकशाहीच्या मुळावर गेली आहे. सूरत कोर्टाने दिलेल्या निर्णयावर सर्वच बोलत आहे. यामध्ये दुसरी एक बाब म्हणजे सूरत कोर्टाने त्यांना वरच्या कोर्टात जाण्याची मुभा दिली आहे. तिथं जर वेगळा निर्णय आला तर मग काय करणार असेही अरविंद सावंत यांनी म्हंटलं आहे.
तर दुसऱ्या बाजूला अरविंद सावंत यांनी इतक्या उतावीळ पणा कशासाठी करत आहात. हाच उतळविणा पणा आमच्या बाबतीत का नाही ? सहा ते सात महीने उलटून गेले अद्याप काहीही नाही. प्रकरण कोर्टात आहे.
सगळ्या संस्था हाताशी धरून काय केलं जात आहे. हे सर्वांना कळत आहे. सूरत ला न्यायाधीश बदलले गेले आहे त्यामुळे तुम्ही पुढची बाब ओळखून घ्या म्हणत नरेंद्र मोदी यांच्यावर खासदार अरविंद सावंत यांनी जहरी टीका केली आहे.
राहुल गांधी यांच्यावर कारवाईच्या संदर्भात उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील. पण दुसऱ्या बाजूला लोकशाहीची मूल्य जपण्यासाठी आम्ही राहुल गांधी आणि कॉंग्रेस सोबत राहू असा विश्वासही अरविंद सावंत यांनी व्यक्त केला आहे.
तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांनीही राहुल गांधी यांच्या कारवाईचा निषेध व्यक्त केला आहे. आणि हुकूमशाहीच्या अंताला सुरुवात झाली आहे. असं म्हणत आता एकत्र येण्याची वेळ आली आहे. अशा शब्दात प्रतिक्रिया देत नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.