अतुल सावेंना औरंगाबादला संधी नाहीच, आठ जिल्ह्यांसाठी नवे पालकमंत्री जाहीर
त्री अतुल सावे यांच्याकडे औरंगाबाद जिल्ह्याची जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. पण त्यांच्याकडे हिंगोलीचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय. तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आणखी एका म्हणजे चंद्रपूरसोबतच गडचिरोलीचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नागपूर : मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता पालकमंत्र्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. विविध आठ जिल्ह्यांसाठी नव्या मंत्र्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्री अतुल सावे यांच्याकडे औरंगाबाद जिल्ह्याची जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. पण त्यांच्याकडे हिंगोलीचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय. तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आणखी एका म्हणजे चंद्रपूरसोबतच गडचिरोलीचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कोणत्या मंत्र्याकडे कोणता जिल्हा?
अमरावती – डॉ. अनिल बोंडे
पालघर – रवींद्र चव्हाण
भंडारा – डॉ. परिणय फुके
गोंदिया – डॉ. परिणय फुके
हिंगोली – अतुल सावे
वर्धा – चंद्रशेखर बावनकुळे
बुलडाणा – संजय कुटे
गडचिरोली – सुधीर मुनगंटीवार
अतुल सावेंना औरंगाबादचं पालकमंत्रीपद नाही
भाजप आणि शिवसेना यांच्यात औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा कलगीतुरा पाहायला मिळण्याची शक्यता होती. औरंगाबाद शहराचे आमदार अतुल सावे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच त्यांच्याकडे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात यावं, अशी मागणी आता स्थानिक भाजपकडून करण्यात आली. सध्या शिवसेनेकडे हे पालकमंत्रीपद असून सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादचे पालकमंत्री आहेत.
सुरुवातीला औरंगाबादचं पालकमंत्रीपद पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडे देण्यात आलं होतं. पण तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासोबत त्यांचे अंतर्गत वाद असल्याचं समोर आलं आणि त्यांची रवानगी करण्यात आली. यानंतर तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे औरंगाबादचं पालकत्व देण्यात आलं, पण त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही जबाबदारी एकनाथ शिंदे यांना देण्यात आली.