भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे, वरळीत पोस्टरबाजी
शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या विधानसभेच्या वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे विजयी झाले (MLA Aaditya Thackeray Chief Minister) आहेत.
मुंबई : शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या विधानसभेच्या वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे विजयी झाले (MLA Aaditya Thackeray Chief Minister) आहेत. आदित्य ठाकरे हे विजयी झाल्यानंतर वरळीमध्ये ‘भावी मुख्यमंत्री’ अशा आशयाचे बॅनर लावले आहे. आदित्य यांच्या रुपानं ठाकरे घराण्यातील तिसरी पिढी पहिल्यांदाच विधानसभेत जाणार (MLA Aaditya Thackeray Chief Minister) आहे.
“शिवसेना युवा नेते मा. भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे यांचे वरळी विधानसभा निवडणुकीत प्रचंड मतानी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन,” अशा आशयाचे बॅनर वरळीत ठिकठिकाणी लावले.
ठाकरे घराण्यातील पहिलाच उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरला होता. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या विधानसभेच्या वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यामुळे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष वरळीतील निकालाकडे लागले होते. आदित्य ठाकरे यांना विजयी करण्यासाठी संपूर्ण शिवसेना कामाला लागली. वरळीचे आमदार सुनील शिंदे, राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले सचिन अहिर, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांनी आदित्य ठाकरेंच्या प्रचाराची धुरा (MLA Aaditya Thackeray Chief Minister) सांभाळली.
आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश माने यांचा पराभव केला. आदित्य ठाकरे यांना 89 हजार 248 मतं मिळाली आहेत. तर सुरेश माने यांना 21 हजार 821 मते मिळाली आहेत. आदित्य ठाकरे 67 हजार 427 अधिक मताधिक्यानं विजयी (MLA Aaditya Thackeray Chief Minister) झाले.
विशेष म्हणजे या मतदारसंघात 6 हजार 305 मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. तर मुंबईतील 36 मतदारसंघात 1 लाखाहून अधिक लोकांना नोटाचा पर्याय निवडला आहे.