राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील सेना संपणार नाही, विनायक राऊतांचा हल्ला; आता निलेश राणेंचं जोरदार प्रत्युत्तर

सात पिढ्या लांब जाण्याची गरज नाही. 2024 नंतर विनायक राऊत आणि त्यांची कुठलीच पिढी कोकणात दिसणार नाही, असा पलटवार निलेश राणे यांनी केलाय.

राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील सेना संपणार नाही, विनायक राऊतांचा हल्ला; आता निलेश राणेंचं जोरदार प्रत्युत्तर
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 8:03 PM

सिंधुदुर्ग : शिवसेने नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “नाराय़ण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही,” असं राऊत यांनी म्हटलंय. त्यानंतर आता निलेश राणे (Nilesh Rane) चांगलेच आक्रमक झाले आहेत. “सात पिढ्या लांब जाण्याची गरज नाही. 2024 नंतर विनायक राऊत आणि त्यांची कुठलीच पिढी कोकणात दिसणार नाही,” असा पलटवार निलेश राणे यांनी केलाय. ते सिंधुदुर्गमध्ये बोलत होते. (Nilesh Rane criticizes Vinayak Raut said he cant understand importance of Narayan Rane Shivsena will vanish in 2024)

कोकणातील हीच पिढी शिवसेनेला संपवेल

“नारायण राणेंसारखा वजनदार माणूस कोकणासाठी काय करून आणू शकतो हे राऊतांना समजणार नाही. कारण त्यांनी साधी बालवाडीसुद्धा कोकणात बांधली नाही. त्यांना राणेंचे महत्व समजणार नाही. कोकणातील हीच पिढी शिवसेनेला संपवेल. त्यामुळे फार सात पिढ्या लांब जाण्याची गरज नाही. 2024 नंतर विनायक राऊत आणि त्यांची कुठलीच पिढी कोकणात दिसणार नाही, याची खात्री आम्ही ही घेतली आहे. लोकही घेतील,” असा पलटवार निलेश राणेंनी विनायक राऊत यांच्यावर केला आहे. .

विनायक राऊत दखल घेण्यासारखं पात्र नाही

तसेच पुढे बोलताना, विनायक राऊत हे दखल घेण्यासारखं पात्र नाही. मात्र राणेंची हीच पिढी जे काही करायचं ते करेल. राणेंचा पुढच्या जन्मावर विश्वास नाही. आम्ही काही करण्यापेक्षा कोकणातील जनताच आता शिवसेनेला संपवेल, याची खात्री आहे. कारण यांना करायचं काहीच नाही. बोलाचा भात आणि बोलाचीच कढी अशी यांची अवस्था आहे. यांचे मुख्यमंत्रीसुद्धा तसेच आणि आमदार, खासदारही तसेच आहेत. त्यामुळे जनआशीर्वाद यात्रा कशासाठी आहे ? हे विनायक राऊत यांना समजणार नाही,” असा टोलादेखील निलेश राणे यांनी लगावला.

विनायक राऊत काय म्हणाले ?

भाजप नेत्यांच्या जनआर्शिवाद यात्रेवरून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर जोरदार टिका केली. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणेंनाही लक्ष्य केलं. जनआशीर्वाद हा शब्द शिवसेनेचाच आहे. तो भाजपने चोरला आहे. अडगळीत टाकलेल्या मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे कोकणात सेनेची ताकद कमी होणार नाही. नाराय़ण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही. नाराय़ण राणेंचा शिवसेनेनेच दोन वेळा पराभव करून दाखवून दिलंय. नाराय़ण राणें म्हणजे पनवती आहेत,” अशी घणाघाती टीका विनायक राऊत यांनी केली होती.

इतर बातम्या :

गजानन काळे प्रकरणावर पहिल्यांदाच ‘ठाकरें’ची प्रतिक्रिया, वाचा शर्मिला ठाकरे नेमक्या काय म्हणाल्या?

Video : चुकीला माफी नाही, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्याच्या पाठीवर दणका! नेमकं कारण काय?

Sai Tamhankar : सई ताम्हणकरची घायाळ करणारी अदा, फोटो पाहाच!

(Nilesh Rane criticizes Vinayak Raut said he cant understand importance of Narayan Rane Shivsena will vanish in 2024)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.