नारायण राणे यांना भाजपाने मुंबईची जबाबदारी का दिली? निलेश राणेंनी सांगितलं नेमकं कारण

भाजप नेते निलेश राणे यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. संख्याबळ आहे तोपर्यंत सर्व ठिक आहे. असं अजित पवार म्हणाले होते.

नारायण राणे यांना भाजपाने मुंबईची जबाबदारी का दिली? निलेश राणेंनी सांगितलं नेमकं कारण
Follow us
| Updated on: Oct 15, 2022 | 2:03 PM

रत्नागिरी : भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. संख्याबळ आहे तोपर्यंत सर्व ठिक आहे. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खरी परिस्थिती समोर येईल. जीथपर्यंत संख्याबळ आहे तिथपर्यंतच हे सरकार टीकेल असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. अजित पवारांवर निलेश राणे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

काय म्हणाले निलेश राणे?

महाविकास आघाडी सरकार देखील संख्याबळ होतं म्हणूनच टीकलं होतं, ते दुसऱ्या एखाद्या फॉर्म्युल्यावर नव्हतं. संख्याबळासाठीच सर्व एकत्र आले होते. अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे त्यांना असं बिनपगारी बोलावं लागतं. मात्र अजित पवार का बोलतात? कशासाठी बोलतात हे आम्हाला चांगलं माहित आहे. त्यांचा प्रभाव सध्या राहिलेला नाही. त्यामुळे अधून-मधून आठवण करून देण्यासाठी ते बोलत असतात असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

‘मुंबई महापालिकेत भाजपाची सत्ता येईल’

दरम्यान आगामी निवडणुकांमध्ये मुंबईत ठाकरे गटाला रोखण्याची जबाबदारी भाजपाकडून नारायण राणे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यावर देखील निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. साहेब हे आमदार होण्यापूर्वी  1985 ला चेंबूरमधून नगरसेवक म्हणून निवडून आले. साहेबांची सुरुवातच शाखाप्रमुख म्हणून मुंबईतून झाली.

हे सुद्धा वाचा

ते 1990 ला आमदार झाले. मात्र त्यांनी कायम आपलं लक्ष मुंबईकडे ठेवलं. मुंबईमध्ये त्यांना माणणारा एक वेगळा वर्ग आहे. त्यामुळे पक्षाकडून त्यांना जी जबाबदारी सोपवण्यात आली आहे, ती ते पूर्व करतील. मुंबई महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकेल याची मला खात्री आहे, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.