संजय राऊतांकडून ओबामांविषयी नाराजी, निलेश राणे म्हणतात “ओबामांचं आता काही खरं नाही”
ओबामांचं कसं होणार या चिंतेत डेमोक्रॅट पक्ष युनायटेड नेशन्सकडे धाव घेण्याच्या विचारात असावा, असं ट्विट निलेश राणेंनी केलं.
मुंबई : “शिवसेना (Shivsena) नाराज झाल्यामुळे अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांना झोप लागत नसेल, ओबामांचं आता काही खरं नाही” असा टोला भाजप आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी लगावला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ओबामांविषयी नाराजी व्यक्त केल्यानंतर निलेश राणेंनी फटकेबाजी केली. (Nilesh Rane taunts Sanjay Raut says Barack Obama wont be able to sleep now)
“शिवसेना हा एका राज्याचा जागतिक पक्ष नाराज झाल्यामुळे बराक ओबामा यांना झोप लागत नसेल. आता ओबामांचं कसं होणार? या चिंतेमध्ये त्यांचा डेमोक्रॅट पक्ष युनायटेड नेशन्सकडे धाव घेण्याच्या विचारात असावा. ओबामांचं आता काही खरं नाही” असं ट्विट निलेश राणेंनी केलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
“परदेशी नेते भारतीय राजकीय नेत्यांविषयी अशी मतं व्यक्त करु शकत नाहीत. ओबामांच्या टिपण्णीवरुन भारतात सुरु झालेला राजकीय वादंगही अयोग्य आहे. आम्ही म्हणतो का ट्रम्प वेडे आहेत? ओबामांना भारताविषयी अशी कितीशी माहिती आहे?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
A foreign politician can’t give such opinions on Indian political leaders; subsequent domestic political discourse on it is distasteful. We won’t say ‘Trump is mad’. How much does Obama know about this nation?: S Raut, Shiv Sena, on remarks on Rahul Gandhi in Barak Obama’s memoir pic.twitter.com/ZaCJL4RNnF
— ANI (@ANI) November 14, 2020
(Nilesh Rane taunts Sanjay Raut says Barack Obama wont be able to sleep now)
ओबामा काय म्हणाले होते?
“राहुल गांधी यांना काहीतरी चांगले करून दाखवायचे आहे, पण त्यांची गुणवत्ता आणि पॅशन अपुरी पडते” अशी टिप्पणी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी केली आहे. “राहुल गांधी हे कसल्या तरी अदृश्य दडपणाखाली असतात. राहुल गांधी म्हणजे असा विद्यार्थी आहेत की, ज्याला शिक्षकांसमोर चांगली कामगिरी करुन दाखवायची असते. पण कुठेतरी त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता किंवा संबंधित विषयात प्रावीण्य मिळवण्याची पॅशन कमी पडते” असे मत बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमधील अनुभवांवर आधारित ‘अ प्रॉमिस लँड’ (A Promised Land) या पुस्तकात मांडले आहे.
चंद्रकांत पाटलांचेही शालजोडे
बराक ओबामा राहुल गांधी यांचा उल्लेख नर्व्हस असा केल्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही प्रश्न विचारला असता याविषयी मला माहित नाही, पण असले प्रश्न संजय राऊत असा टोला लगावला होता. “बराक ओबामा यांनी आत्मचरित्रामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा उल्लेख नर्व्हस आणि कमी योग्यतेचा असा केला आहे, त्यावर काय म्हणाल?” असं पत्रकाराने विचारलं. त्यावर “अरे एवढं वाचन नाही माझं, संजय राऊतांना विचारा” असं हसत-हसत सांगून चंद्रकांत पाटील निघाले होते.
संबंधित बातम्या :
असले प्रश्न संजय राऊतांना विचारा, पत्रकारांना उत्तर देत चंद्रकांतदादांचे मिश्कील हास्य
राहुल गांधींना काहीतरी करून दाखवायचेय पण त्यांची गुणवत्ता आणि पॅशन अपुरी पडते : बराक ओबामा
(Nilesh Rane taunts Sanjay Raut says Barack Obama wont be able to sleep now)