अजित पवार साहेब, भाषा नीट करा, नाहीतर तुमची घमेंड उतरवेन, निलेश राणेंचा हल्लाबोल

निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय" अशा शब्दांत अजित पवार यांनी निलेश राणेंवर टीकेची झोड उठवली होती. (Nilesh Rane warns Ajit Pawar)

अजित पवार साहेब, भाषा नीट करा, नाहीतर तुमची घमेंड उतरवेन, निलेश राणेंचा हल्लाबोल
Nilesh Rane and Ajit Pawar
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 12:59 PM

मुंबई : “अजित पवार साहेब, तुमची भाषा नीट करा, नाहीतर एक दिवस तुमची घमेंड उतरवल्याशिवाय राहणार नाही” असा इशारा माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिला. निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, अशा शब्दात अजित पवारांनी (Ajit Pawar) निलेश राणेंवर हल्लाबोल चढवला होता. (Nilesh Rane warns Ajit Pawar over criticism)

“फार कमी नेते आहेत महाराष्ट्रामध्ये, ज्यांना अनेक वर्ष मंत्रिपदं मिळाली, तरी पण महाराष्ट्राच्या विकासामध्ये काही परिणाम झाला नाही. त्यामध्ये अजित पवार यांचं नाव घ्यावं लागेल. अजित पवार साहेब, भाषा नीट करा तुमची, नाहीतर हाच निलेश राणे एक दिवस तुमची घमेंड उतरवल्याशिवाय राहणार नाही” असा इशारा निलेश राणेंनी ट्विटरवरुन दिला.

धनंजय मुंडे प्रकरणावरुन राष्ट्रवादीवर निशाणा

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर भाजपकडून राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यानंतर निलेश राणेंनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल चढवला होता.

निलेश राणे काय म्हणाले होते?

“काय चाललंय महाराष्ट्रात? मुंबईचे सहपोलिस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी? हा तर केस झाकायचा अजेंडा दिसतो. अशाने पोलिसांवरील विश्वास उडेल लोकांचा… सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का हे पण आयुक्तांनी सांगावं” असं ट्विट निलेश राणेंनी केलं होतं. मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओकमधील निवासस्थानी घेतलेल्या भेटीच्या पार्श्वभूमीवर निलेश राणेंनी संताप व्यक्त केला होता.

“जेलपेक्षा अधिक गुन्हेगार राष्ट्रवादीत”

“मोदी साहेबांमुळे डिजिटल पेमेंट करायची लोकांना सवय झाली आणि डिजिटल पेमेंटमुळे नवाब मलिक यांचा जावई ड्रग्जच्या लफड्यात पकडला गेला. राष्ट्रवादीत चाललंय काय?? इतके क्रिमिनल मिळून एका जेलमध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत” असा टोलाही त्यांनी लगावला होता. (Nilesh Rane warns Ajit Pawar over criticism)

अजित पवारांचे उत्तर

“ते काही बोलतात आणि त्यावर मी बोलायचे का? एक सांगतो त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय” अशा शब्दांत अजित पवार यांनी निलेश राणेंवर टीकेची झोड उठवली होती.

संबंधित बातम्या :

“मुंबईचे सहपोलीस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात”

(Nilesh Rane warns Ajit Pawar over criticism)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.