रमेश लटके यांना किती मानसिक त्रास झाला हे त्यांनी मला स्वत: सांगितलं, नितेश राणेंचा पुन्हा एकदा ‘मातोश्री’वर गंभीर आरोप

नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांना स्वत:चा पक्ष वाचवता आला नाही, चिन्ह वाचवता आलं नाही असं राणे यांनी म्हटलं आहे.

रमेश लटके यांना किती मानसिक त्रास झाला हे त्यांनी मला स्वत: सांगितलं, नितेश राणेंचा पुन्हा एकदा 'मातोश्री'वर गंभीर आरोप
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 14, 2022 | 1:29 PM

मुंबई :  गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडी पहाता अंधेरी पूर्व विधानसभेची निवडणूक ठाकरे गट, शिंदे गट तसेच भाजपासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. आमचाच उमेदवार विजयी होणार असा दावा दोन्ही गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. भाजपकडून (BJP) या पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल (Murji Patel) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. लोकांमध्ये 24 तास काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला भाजपाने उमेदवारी दिली. ही गर्दी म्हणजे आमच्या मुरजी भाईंच्या कामाची पोहोचपावती आहे. मला विश्वास आहे की जसं आता वातावरण आहे तसंच निवडणूक झाल्यावरही दिसेल असंही यावेळी नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

ठाकरे गटावर निशाणा

दरम्यान यावेळी नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. त्यांना स्वत:चा पक्ष वाचवता आला नाही, चिन्ह वाचवता आलं नाही. वडिलांच्या आजारावेळी आदित्य ठाकरे बाहेरगावी पार्ट्या करत होते. एकदा प्रवासादरम्यान स्वत: रमेश लटके यांनी मला त्यांना किती मानसिक त्रास सुरू आहे हे सांगितलं. त्यांचे फोन मातोश्रीवर उचलण्यात येत नव्हते, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. दरम्यान या सर्व गोष्टी बाहेर निघाल्यानंतर सहानुभूती कोणाला मिळते ते पाहू असंही नितेश राणे यांनी यावेळी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरेंची टीका

दरम्यान दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी देखील शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. कालपर्यंत एका स्त्रीला त्रास देण्यात आला. आमची ही लढाई गद्दार वृत्तीच्या विरोधात आहे, त्यामुळे आम्हाला विजय निश्चित मिळेल असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.