Nitesh Rane | पोलिसांचा गराडा बाजूला करा, मग जीभ कशी वापरायची हे भाजप कार्यकर्ता दाखवेल, नितेश राणेंचा संजय राऊतांना इशारा

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली आहे. महिला अत्याचारावरुन शिवसेनेला (Shivsena) देखील त्यांनी सुनावलं आहे.

Nitesh Rane | पोलिसांचा गराडा बाजूला करा, मग जीभ कशी वापरायची हे भाजप कार्यकर्ता दाखवेल, नितेश राणेंचा संजय राऊतांना इशारा
नीतेश राणे, संजय राऊत.
Follow us
| Updated on: Dec 10, 2021 | 2:07 PM

मुंबई: भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली आहे. महिला अत्याचारावरुन शिवसेनेला (Shivsena) देखील त्यांनी सुनावलं आहे. आपल्या राज्यामध्ये काही लोकांची जीभ जास्त चालायला लागली आहे. संजय राऊतांच्या जीभेचे तर संशोधन करायला हवं असं माझं मत आहे. संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आपलं गुरू मानू नये आणि बोलू नये, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

संजय राऊत यांनी हिंमत असेल तर त्यांनी आपल्या शब्दावर ठाम रहावं आणि पोलिसांचा गराडा बाजूला करावा, मग जीभ कशी वापरायची हे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता त्यांना दाखवेल, असा इशारा नितेश राणेंनी दिला आहे.

महिला अत्याचारावर बोलण्याचा शिवेसेनेला अधिकार राहिलाय का?

आशिष शेलार आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्यातील वादावर देखील नितेश राणे यांनी भाष्य केलं आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी पूजा चव्हाणच्या मृत्यूला जबाबदार असलेलं चालतं. आशिष शेलारांनी जे कधी म्हंटलच नाही ते या लोकांना चालत नाही. महिलांवरील अत्याचारा बद्दल शिवसेनेला बोलण्याचा अधिकार राहिला आहे का?, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

राज्यात महिला सर्वात असुरक्षित

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात महिला सर्वात असुरक्षित आहेत. कायदा आणि सुव्यवस्था यांचे धिंडवडे निघाले आहेत.शिवसेनेच्या महिलांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्या आपल्या या नेत्यांवर आक्षेप घ्यावा.घाणेरडं राजकारण करून जे बोललं नाही त्या वक्तव्यावर कशाला बोंबाबोंब करताय, असा सवाल देखील नितेश राणे यांनी केला आहे.

ओबीसींवर सरकारमुळं अन्याय

इंम्पेरिकल डाटा हा राज्य सरकारने तयार करायचा आहे.त्यासाठी 200 ते 300 कोटी हे राज्य सरकारने आपल्या अर्थखात्यातून द्यायचे आहेत.हे पैसे राज्यसरकारने का दिले नाहीत हे ओबीसींचे नेते छगन भुजबळ आणि विजय वडडेट्टीवार यांनी सांगावं. तो डाटा तयार न केल्यामुळे ओबीसी समाजाच्या उमेदवारांवर मोठा अन्याय झाला आहे.मग नेमकं जबाबदार कोण आहे?, असा सवाल नितेश राणेंनी केला.

मराठा आणि ओबीसी समाजाचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न

छगन भुजबळ साहेबांना अजित दादांवर बोट उचलण्याची हिंमत आहे का?मराठा समाज,ओबीसी समाज यांचं अस्तित्व मिटविण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय?छगन भुजबळ यांनी दिल्लीत बसण्यापेक्षा अजित दादांच्या घरी जाऊन बसले असते आणि त्यांच्याकडून 300 कोटी आणले असते तर आज ओबीसी समाजाच भलं झालं असतं. याच उत्तर छगन भुजबळ यांनी द्यावं.मी जर खोटं बोलत असेन तर ते जिथे सांगतील तिथे यायला तयार आहे आणि येऊन त्यांची माफी मागायला तयार आहे.

इतर बातम्या:

Omicron Maharashtra Update : महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी, पुण्यासह पिंपरीतील 4 ओमिक्रॉनच्या रुग्णांसंदर्भात महत्त्वाची अपडेट

School: शाळा सुरु करण्याचा एकत्रित निर्णय 15 डिसेंबरला राज्यस्तरावर घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Nitesh Rane gave warning and gave challenge to Sanjay Raut came without Police Protection

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.