राणे पिता-पुत्राला न्यायालयाचा दिलासा, अटी, शर्तींसह अटकपूर्व जामीन मंजूर

दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता

राणे पिता-पुत्राला न्यायालयाचा दिलासा, अटी, शर्तींसह अटकपूर्व जामीन मंजूर
नितेश राणेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 12:58 PM

मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे (nitesh rane) यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. राणे पिता-पुत्रा विरोधात दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिंडोशी (dindoshi) सेशन कोर्टात नुकताच राणे पिता-पुत्राला जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयाने जामीन मंजूर करीत असताना काही अटी आणि शर्टी ठेवल्या असल्याचे  नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. तसेच नितेश राणे यांनी न्यायालयाचे देखील आभार मानले आहेत. लोकशाहीमध्ये आम्हा लोकप्रतिनिधींना जे काही अधिकार दिले आहेत. त्या अधिकारांचं आम्ही पालन करतो. कोणा विरोधात अन्याय होत असेल त्याला न्याय देण्याचं काम आम्ही करतो. ते अधिकार न्यायालयाने कायम ठेवले त्यासाठी न्यायालयाचे मी आभार मानतो असं नितेश राणेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

महापौर घरी गेल्या त्यानंतर बऱ्याच हालचाली झाल्या

दिशा सॅलियन प्रकरणात वादग्रस्त विधान केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज दिंडोशी न्यायालयात पिता-पुत्राला जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दिशा सॅलीयनला न्याय देण्यासाठी जे-जे करता येईल ते आम्ही करत राहणार, मुंबईच्या महापौर त्यांच्या घरी गेल्यानंतर बऱ्याच हालचाली झाल्या आहेत. आता नवीन पोलिस कमिशनर आले आहेत. त्यांना सुध्दा यादी देण्यात आली आहे, त्यावर आता टिकमार्क करायचं काम सुरू आहे. 9 तास चौकशी करताना पोलीस अधिकाऱ्याला दर 15 मिनिटांनी फोन येत होता. हे येणारे फोन कोणाचे होते याची देखील चौकशी व्हायला हवी अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

सरकारमधील कोणी तरी दिशा सालीयन प्रकरणात अडकला आहे

महाविकास आघाडी सरकार विनाकारण आमच्या विरोधात षडयंत्र रचून आम्हाला मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारमधील कोणी तरी दिशा सॅलीयन प्रकरणात अडकला आहे, राज्यातले काही मंत्री या प्रकरणात अडकले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची आम्ही मागणी करणार आहोत असंही नितेश राणेंनी सांगितले.

राणे पिता-पुत्राला न्यायालयाचा दिलासा, अटी, शर्तींसह अटकपूर्व जामीन मंजूर

TV9 Poll : गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेसची अवस्था आणखी दयनीय होईल?; वाचा पोल काय सांगतो?

सहकार क्षेत्राला ‘संजीवनी’ देणारा महर्षी हरपला; माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निधन

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.