“मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाला मोठा विरोध संजय राऊतांचा होता”
Nitesh Rane on Sanjay Raut Uddhav Thackeray Maharashtra CM : भाजपचे नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केला आहे. त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांचंही नाव घेतलं आहे. वाचा सविस्तर...
भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. भांडुपमध्ये बसून संजय राजाराम राऊतला मंगेरी लाल के हसीन सपने पडत होते. संजय राजाराम राऊतने आपल्या दोन्ही मुलींच्या डोक्यावर हात ठेवून एक सत्य सांगावं. उद्धव ठाकरेंच्या नावाला मोठा विरोध हा संजय राऊतचा होता. ज्याला कुठला अनुभव नाही. ज्याला पक्ष चालवता येत नाही. त्याला तुम्ही मुख्यमंत्री कसे करता? हे तुम्ही शरद पवार यांना विचारलं नव्हतं का? याने मातोश्रीत जाऊन उद्धव ठाकरे यांना ब्लॅक मेल करायला सुरुवात केली होती. सर्वात मोठा विरोध हा संजय राऊतांचाच होता, असं नितेश राणे म्हणालेत.
संजय राऊत यांनी काय म्हटलं होतं?
संजय राऊतांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. शरद पवार राहुल गांधी यांच्या विषयी मी इतका सांगेल की या दोघांचाही एकमत होतं. त्यांचा एक मत असा होता की, या सरकारचा नेतृत्व असा असावा की त्या प्रत्येक घटकाला मान्य असावा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी नको, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही. हे सांगायला सर्वात आधी सुनील तटकरे अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील होते. त्यांचं म्हणणं होतं आम्ही सिनेमा आहोत आम्ही जूनियर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही. 2019 लासुद्धा मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जो वाद झालेला होता. तेव्हा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाली होती. शिवसेनाकडून त्यांचं नाव पुढे गेलेला होतं, असं संजय राऊत म्हणावे होते. त्यांच्या वक्तव्याला नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे.
तुम्ही मला मुख्यमंत्री बनवलं नाही. तर मी मातोश्रीच्या आतल्या बातम्या बाहेर सांगेन. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांची प्रॉपर्टी कशी हडप केली. याची कागदपत्रे बाहेर देईन, अशी धमकी संजय राऊतने उद्धव ठाकरेंना दिली नव्हती का? शरद पवारांना देखील जाऊन सांगितलं होतं की, माझं नाव मुख्यमंत्री म्हणून चालवा असा आग्रह धरला नव्हता का?, असं नितेश राणे म्हणालेत.
संजय राऊतांवर टीका
सामना कार्यालातून किती आमदारांना फोन झाले होते की तुम्ही संजय राऊटचे नाव मुख्यमंत्री म्हणून सुचवा. कुठले ब्लॅक मेलिंगचे धंदे सुरू केले होते. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवू देऊ नका. माझं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे करा, असं सागितलं नव्हतं का? हा गौप्यस्फोट संजय राऊतने करावा. त्यामुळे शिंदे साहेब यांच्या नावाला कसा विरोध होता. या खोट्या बातम्या नंतर पसरवा, असं म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र डागलं आहे.