एक लोकांसाठी तुरुंगात जातो, एक नालेसफाईचं पाप झाकतो, राणे समर्थकांची पोस्टरबाजी

युवासेनेकडून नितेश राणेंच्या कोठडीनिमित्त सोशल मीडियावर उपहासात्मक पोस्टर शेअर करण्यात आलं. त्यानंतर आता नितेश राणे यांच्या समर्थकांकडूनही पोस्टरबाजीच्या माध्यमातून शिवसेनेला उत्तर देण्यात आलं आहे.

एक लोकांसाठी तुरुंगात जातो, एक नालेसफाईचं पाप झाकतो, राणे समर्थकांची पोस्टरबाजी
Follow us
| Updated on: Jul 08, 2019 | 11:14 PM

मुंबई: शिवसेनेकडून नितेश राणेंच्या कोठडीनिमित्त सोशल मीडियावर उपहासात्मक पोस्टर शेअर करण्यात आलं. त्यानंतर आता नितेश राणे यांच्या समर्थकांकडूनही पोस्टरबाजीच्या माध्यमातून शिवसेनेला उत्तर देण्यात आलं आहे. यात नितेश राणेंना वाघ म्हणत आदित्य ठाकरे बापाचं पाप झाकत असल्याचा आरोप केला आहे. युवासेनेच्या मेसेजमध्ये युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे चिखलात उतरुन घाण साफ करताना दिसत होते. तसेच त्यांची तुलना नितेश राणेंनी अधिकाऱ्याला घातलेल्या चिखलाच्या आंघोळीशी केली जात होती.

राणे समर्थकांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टरमध्ये नितेश राणेंची तुलना वाघाशी करत ते लोकांसाठी तुरुंगात गेल्याचं म्हटलं आहे. तसेच युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे मात्र नालेसफाईतील भ्रष्टाचाराचं पाप झाकत असल्याचा आरोप केला आहे. राणे समर्थकांनी या पोस्टरला दोन कॅप्शन दिले आहेत. एकात म्हटलं आहे, “लोकांसाठीच ओतला चिखल अधिकाऱ्यावर वाघानं, बापाच्या नालेसफाईचं पाप सफाईतून झाकलं पेंग्विननं”. तर दुसऱ्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, “एक लोकांसाठी तुरुंगात जातो, एक नालेसफाईचं पाप झाकतो”.

युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आदित्या ठाकरे आणि नितेश राणेंच्या फोटोंचं पोस्टर फेसबुकवर शेअर करत दोघांची तुलना केली होती. या फोटोत एका बाजूला आदित्य ठाकरेंनी मुंबईतील वर्सोव्हा बीचवर चिखलात उतरुन केलेली सफाई, तर दुसऱ्या बाजूला नितेश राणे यांनी उपअभियंते प्रकाश शेडेकर यांना घातलेली चिखलाची आंघोळ दाखवली. युवासेनेच्या पोस्टरला “चिखल इथंही आहे, चिखल तिथंही होता, पण तो गजाआड आहे, हा मनाआड’ असं कॅप्शन लिहिलं होतं.

नितेश राणे विरुद्ध आदित्य ठाकरे

नितेश राणे यांचे वडील- खासदार नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यात वाद पेटला होता. अनेकवेळा या दोघांमध्ये वादावादी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. काही वर्षांपूर्वी वरळी परिसरात ओव्हरटेक करण्यावरुन नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यात वाद झाला होता. तो पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला होता. त्यानंतरही नितेश आणि निलेश राणे विरुद्ध आदित्य ठाकरे असा वाद वेळोवेळी पाहायला मिळतो.

आदित्य ठाकरेंकडून वर्सोव्हा बीचची साफसफाई

आदित्य ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून वर्सोव्हा बीच साफसफाईची मोहीम हाती घेतली आहे. नुकतंच आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या 500 कार्यकर्त्यांसह वर्सोव्हा बीचची सफाई केली.  आदित्य ठाकरेंनी स्वत: जवळपास तीन तास साफसफाई केली.  आदित्य ठाकरे यांनी गेल्या आठवड्यातही वर्सोवा किनाऱ्याची सफाई केली होती. त्यानंतर पुन्हा कालच्या रविवारी त्यांनी वर्सोवा बीच स्वच्छता केली. बीचवरील प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या, थर्माकोलसह अन्य कचरा स्वत: आदित्य ठाकरेंनी उचलला

नितेश राणेंकडून उपअभियंत्याला धक्काबुक्की

आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी (4 जुलै) रोजी मुंबई गोवा रस्त्याच्या दुरावस्थेमुळे उपअभियंते प्रशांत शेडेकर यांना धक्काबुक्की करत चिखलाची आंघोळ घातली होती. गेल्या काही वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागतं. त्यामुळे आमदार नितेश राणे यांनी आक्रमक पावित्रा घेत उपअभियंत्याला धक्काबुक्की केली.  याप्रकरणी शेडेकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयाने नितेश राणे यांना 9 जुलैपर्यंत कोठडी सुनावली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.