Nitesh Rane on Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंच्या विधानावर नितेश राणेंचं पुन्हा म्याव म्याव!
केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्यामध्ये आणि शिवसेना नेत्यांमध्ये या न त्या कारणावरुन वार पलटवार होत असतात. दोन्ही मोठ्या नेत्यांकडून टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. यातच आता पुन्हा एकदा नितेश राणे यांनी शिवसेनेला लक्ष केलंय.
मुंबई : एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) विरुद्ध ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत चालला. यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता देखील व्यक्त केली जातेय. असं असताना शिवसेनेला (Shivsena) मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतंय. यातच आता पुन्हा एकदा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांना डिवचंलय. नितेश राणे यांनी ट्विट करुन आदित्य ठाकरे यांना डिवचलंय. यापूर्वी देखील नितेश राणे यांनी विधिमंडळाच्या इमारतीबाहेर आदित्य ठाकरेंना डिवचलं होतं. यावेळी भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलाच वार-पलटवार बघायला मिळाला होता. विधिमंडळातही त्यावेली हा मुद्दा गाजला तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील यावर पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर टीका केली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा असाच प्रकार पहायला मिळालाय.
नितेश राणेंनी काय म्हटलंय?
आमदार नितेश राणे यांनी ट्विट करताना म्हटलंय की, एअरपोर्ट ते विधानभवनाचा रस्ता वरळीतूनच जातो. माझ meow meow ऐकून थांबा बररर..का !!’ असं म्हणत पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंना लक्ष केलंय.
नितेश राणेंचं ट्विट
एअरपोर्ट ते विधानभवनाचा रस्ता वरळीतूनच जातो.. माझ meow meow ऐकून थांबा बररर..का !! pic.twitter.com/X2fwT96oY6
— nitesh rane (@NiteshNRane) June 25, 2022
राणे विरुद्ध ठाकरे
केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये या न त्या कारणावरुन वार पलटवार होत असतात. दोन्ही मोठ्या नेत्यांकडून टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. यातच आता पुन्हा एकदा नितेश राणे यांनी शिवसेनेला लक्ष केलंय.
नितेश राणेंचं म्याव म्याव
यापूर्वी नितेश राणे यांनी अधिवेशनात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. आदित्य ठाकरे विधानसभेत येत असताना पायरीवर आंदोलन करत असलेल्या नितेश राणे यांनी म्याव म्याव करून डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एक फोटो ट्वीट केला होता. मलिक यांनी कोंबडीचा फोटो ट्वीट करत नितेश राणेंवर निशाणा साधला. या फोटोकडे निट पाहिलं तर शरीर कोंबडीचं आणि तोंड मांजरीचं असल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच हा फोटो ट्वीट करताना मलिक यांनी पैहचान कौन? असा खोचक सवालही केला होता. त्याला उत्तर म्हणून नितेश राणेंनीही डुकराचा एक फोटो ट्विट केला होता. “ही प्रजाती फक्त भंगारात आढळते, ओळखा पाहू कोण?”, अशा ओळी नितेश राणे यांनी ट्विट केलेल्या फोटोसोबत लिहिल्या होत्या. यानंतर प्रचंड राजकारणही तापलं होतं,