Breaking : ‘शरीरात चुकीचं औषध टाकून मला संपवण्याचा डाव होता’, नितेश राणेंचा गंभीर आरोप; ‘कलानगर’चाही उल्लेख!
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केलाय. शरीरात चुकीचं औषध टाकून मला मारण्याचा कट होता. त्यांना सर्व विरोधकांनाही असंच संपवायचं आहे, असा खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी गुरुवारी विधानसभेत केलाय.
मुंबई : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) गंभीर आरोप केलाय. शरीरात चुकीचं औषध टाकून मला मारण्याचा कट होता. त्यांना सर्व विरोधकांनाही असंच संपवायचं आहे, असा खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी गुरुवारी विधानसभेत केलाय. संतोष परब हल्ला प्रकरणात (Santosh Parab Attack Case) नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यावेळी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे, तसंच त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे कोल्हापूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. तिथे आपल्याला मारण्याचा सरकारचा डाव होता, असा आरोप करत राणेंनी राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिलीय.
Nitesh Rane यांचा सनसनाटी आरोप ‘माझा जीव घेण्याचा कट रचला गेला होता’#NiteshRane #BJP #VidhanParishad #Maharashtra
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/EXaQRywSvh pic.twitter.com/gucbRbiQVt
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 24, 2022
नितेश राणेंचा नेमका आरोप काय?
नितेश राणे यांनी संतोष परब हल्ला प्रकरणात आपल्याला गोवण्यात आल्याचा आरोप केलाय. नितेश राणे म्हणाले की, ‘या प्रकरणात मला पोलिसांचा, प्रशासनाला आलेला अनुभव थक्क करणारा आहे. एक लोकप्रतिनिधी, एका आमदारासोबत कोणत्या पद्धतीने वागले, ते प्रकरण कशा पद्धतीनं हाताळलं गेलं, त्याचा विचार या सभागृहानं करण्याची गरज आहे. डॉक्टर, पोलीस अधिकारी किंवा कोर्ट परिसरातील एसपींचा वावर असो. या सभागृहानिमित्तानं फार महत्वाची माहिती मला गृहमंत्र्यांना द्यायची आहे. कोल्हापूरच्या जिल्हा रुग्णालयात मला दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टर माझ्याकडे आले आणि मला आग्रह करु लागले की तुम्हाला सीटी एनजीओ करावा लागेल. मी म्हटलं मला आता तसं काही वाटत नाही. माझा बीपी आणि सर्व गोष्टी लो होत्या ते मला कळत होत्या. पण नाही नाही तुम्हाला सीटी-एनजीओ करावा लागेल. आता सगळेच काही सरकारच्या बाजूने नसतात, काही आमच्याही ओळखीचे आहेत. काही कर्मचाऱ्यांनी मला येऊन सांगितलं की साहेब हे सीटी-एनजीओ करु नका. कारण, त्यासाठी इंक तुमच्या शरीरात टाकावी लागते आणि ती इंक टाकून तुम्हाला मारण्याचा डाव आहे. मारुन टाकण्याचा डाव आहे, कुठल्याही परिस्थितीत नितेशजी होकार देऊ नका, हे तिथल्या कर्मचाऱ्यानं मला सांगितलं’.
‘माझी अवस्था बघून पोलीस परत गेले’
हा प्रकार माझ्यासोबत कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयात झालाय. रिपोर्टमध्ये माझा बीपी, शुगर लेव्हल लो दाखवत होते. तरीही रात्री अडीच वाजता दोनशे पोलीस मला डिस्चार्ज करण्यासाठी आले. आताच्या आता डिस्चार्ज करा आणि अटक करुन जेलमध्ये टाका. पोलीस आले तेव्हा त्यांनी पाहिलं की अवस्था खरंच खराब आहे. तेव्हा ते पोलीस बाहेर गेले, असा दावा नितेश राणे यांनी केलाय.
‘विरोधकांना जिवंतच ठेवायचं नाही असा प्रकार सुरु’
पोलिसांवर वारंवार दबाव टाकला जात होता, मुंबईकडून फोन येत होते, वारंवार कलानगर परिसरातून फोन येत होते, की यांना कुठल्याही पद्धतीत डिस्चार्ज करा आणि अटक करा. अशा पद्धतीचा व्यवहार त्या एका केसमध्ये सुरु होता. विरोधी पक्षाच्या लोकांना सभागृहात येऊच द्यायचं नाही, जिवंतच ठेवायचं नाही, असा प्रकार सुरु असल्याचा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केलाय.
इतर बातम्या :