Nitesh Rane : नितेश राणेंच्या गाडीला अपघात, ट्रकने दिली मागून धडक
नितेश राणे मुंबईला येत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे. ज्यावेळी गाडी टोल भरण्यासाठी उभी होती. त्यावेळी मागून आलेल्या ट्रकने राणेंच्या गाडीला जोराची धडक दिली. हा अपघात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झाला आहे.
पुणे – मुंबई पुणे महामार्गावर सध्या गणेशोत्सवामुळे (Ganeshotsav 2022) वाहनांची प्रचंड गर्दी आहे. त्याचबरोबर रस्त्यावर सुद्धा ट्रॅफिक सुद्धा अधिक आहे. आज नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या गाडीला अपघात झाला आहे. ज्यावेळी गाडीचा अपघात झाला, त्यावेळी गाडीत त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलं आणि नातेवाईक होते. हा अपघात उर्से टोल नाका येथे झाला आहे. ट्रकने (Truck) धडक दिल्याने अपघात झाला आहे.
नितेश राणे मुंबईला येत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे. ज्यावेळी गाडी टोल भरण्यासाठी उभी होती. त्यावेळी मागून आलेल्या ट्रकने राणेंच्या गाडीला जोराची धडक दिली. हा अपघात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झाला आहे.
हे सुद्धा वाचा
हा अपघात नॉर्मल असल्यामुळे गाडीतील कोणालाही दुखापत झालेली नाही. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कर्नाटक मधील ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे.