आमदार-खासदार कॉन्ट्रॅक्टरला म्हणतात, काम नंतर सुरु कर, आधी आम्हाला भेट : नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा व्यवस्थेतील उणीवांवर बोट ठेवत आमदार आणि खासदारांच्या कामावर निशाणा साधला आहे (Nitin Gadkari on MLA MP corruption).

आमदार-खासदार कॉन्ट्रॅक्टरला म्हणतात, काम नंतर सुरु कर, आधी आम्हाला भेट : नितीन गडकरी
Follow us
| Updated on: Jan 12, 2020 | 5:35 PM

औरंगाबाद : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा व्यवस्थेतील उणीवांवर बोट ठेवत आमदार आणि खासदारांच्या कामावर निशाणा साधला आहे (Nitin Gadkari on MLA MP corruption). आमच्याकडे काम सुरु झालं की आमदार आणि खासदार कॉन्ट्रॅक्टरला म्हणतात काम नंतर सुरु कर आधी आम्हाला भेट. हे दुसरीकडे नाही, मराठवाड्यात सुरु आहे, असं स्पष्ट मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं (Nitin Gadkari on MLA MP corruption). गडकरी औरंगाबादमधील औद्योगिक प्रदर्शन सोहळ्यात आले असताना त्यांनी उद्योजक मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले, “सर्व बँकांचे चेअरमन माझ्या त्यांच्याकडून पैसे घ्यावेत मागे लागले आहेत. सध्या 3-4 लाख कोटी रुपये माझ्या खिशात पडलेले आहेत. बीओटीवर काम करा, पैसे मिळतात. सरकारकडे पैसे नाहीत.” यावेळी गडकरींनी शिर्डीला जाण्यासाठी चौपदरी रस्ता लवकर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही सांगितलं.

“मागच्या जन्मी ज्यांनी पाप केलं, ते साखर कारखाना चालवतात”

गडकरी यांनी यावेळी सहकार क्षेत्रावरही निशाणा साधला. ज्यांनी मागच्या जन्मी पाप केलं असेल, तेच आता साखर कारखाना चालवतात असं मत गडकरींनी व्यक्त केलं. गडकरी म्हणाले, “आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा तीन विचारधारा होत्या. त्यात पहिली समाजवादी विचारधारा होती. समाजवादी विचारधारा त्यावेळी प्रतिष्ठित समजली जायची. त्यानंतर कम्युनिझम विचारधारा होती. मात्र, आता चीनने सुध्दा ही विचारधारा सोडली आहे. तिसरी विचारधारा म्हणजे भांडवलशाही विचारधारा. त्याचाही एक पक्ष आपल्याकडे स्थापन झाला होता. पण या तीनही विचारधारा आपल्याकडे चालू शकल्या नाहीत.”

“गरिबी घालवायची असेल तर रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे”

गडकरी म्हणाले, “आपल्या देशातील गरिबी घालवायची असेल, तर रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला समाजचं जगणं सोपं करता येईल. उद्यमशीलता विकसित झाली, तरच काही करता येऊ शकतं. आपल्या देशात 7 लाख कोटी रुपयांचं इंधन आयात केलं जातं. पण आपला शेतकरी जट्रोफाच्या रुपाने त्याला पर्याय देऊ शकतो. जट्रोफाच्या पेट्रोलवर आपल्या देशातील जेट विमानाचे डेमो यशस्वी झाले आहेत.”

“मी विजयी झालो, तर माझ्या स्वागताला कुत्रं पण येत नाही”

आमचे राजकारणी हरले की याने त्याने हरवलं असं सांगतात. पण मी सांगतो अरे आपले परिश्रम कमी पडले असं समजा. तुमच्याकडे गुणवत्ता असेल, तर लोक लाईन लावून तुमच्याकडे येतात. राजकारणात सुद्धा असंच आहे. मी जॉर्ज फर्नांडिस यांना आदर्श मानतो. मी विजयी झालो, तर माझ्या स्वागताला कुत्रं पण येत नाही. विमानतळावर स्वागताला यायची काय गरज आहे? मी माझ्या आयुष्यात 20 रुपये खर्चून एकही बॅनर लावलं नाही, असंही गडकरींनी नमूद केलं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.