नागपूर : गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) भाजपला मोठा विजय मिळालाय. 20 जागांसह गोव्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. काही अपक्ष आणि मगोपनेही भाजपला पाठिंबा दिल्यानं गोव्यात पुन्हा भाजप सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट आहे. गोव्यातील भाजपच्या विजयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा सिंहाचा वाटा आहे. गोवा भाजप प्रभारी म्हणून फडणवीस यांनी रणनिती आखण्यापासून, उमेदवार निवड ते गल्ली बोळात जाऊन प्रचार करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. अशावेळी नागपुरात आज फडणवीसांचं जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरीही (Nitin Gadkari) उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी गोव्या भाजपला टक्कर देण्याची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर जोरदार टोलेबाजी केलीय.
भारतीय जनता पक्ष, नागपूर महानगर विजयोत्सव कार्यक्रमातून लाईव्ह https://t.co/JB1CKjhBgB
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) March 17, 2022
गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा दारूण पराभव झाला. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मतं मिळाली. हाच धागा पकडत नितीन गडकरी यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर हल्ला चढवला. गोव्याच्या जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. गडकरी पुढे म्हणाले की, गोव्यात आम्हाला पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळालं. मनोहर पर्रिकर असतानाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही. भाजपसाठी अनुकूल स्थिती असतानाही आम्हाला स्पष्ट बहुमत मिळत नव्हतं. अशास्थितीत फडणवीस यांची गोव्याच्या निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती केली आणि त्यांनी त्यांचं नेतृत्व सिद्ध केलं. गोव्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं अपशकून करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोव्याच्या जनतेनं त्यांचं स्थान काय आहे हे दाखवून दिलं’, अशी टीका गडकरी यांनी केलीय.
गोव्यासह इतर तीन राज्यांत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या विजयाबद्दल भाजप, नागपूर महानगरच्या वतीने आयोजित विजयोत्सव आणि अभिनंदन सोहळ्याची क्षणचित्रे. @Dev_Fadnavis @cbawankule @PravinDatke @BJP4Maharashtra pic.twitter.com/1rZqb6gFXJ
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) March 17, 2022
राज्यात भ्रष्टाचारी सरकारविरोधात सामान्य माणूस भाजपच्या सोबत आहे. राज्यातील सरकार हे महाविकास आघाडी नाही, ही महावसुली आघाडी आहे. सरकारमधील दोन मंत्री जेलमध्ये आहेत. राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधातील लढाई शिगेला पोहचली आहे. प्रवीण दरेकरांना फसविण्याचा प्रयत्न झाला. तरीही तुमच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलणं थांबणार नाही, असं फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं. शेवटी फडणवीस यांनी गोवा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, असा निर्धार केला. महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Blessed. Honoured.
Grateful to get blessings and guidance of our leader Hon Union Minister @nitin_gadkari ji.
Thank you once again, #Nagpur !#BJP #warmth #love https://t.co/K1bERn7imJ— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 17, 2022
इतर बातम्या :