गडकरी-फडणवीसांचा 36 चा आकडा, वडेट्टीवारांचा दावा, गडकरी म्हणतात, देवेंद्र भावासारखे…
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नांदेडमध्ये देगलूर बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात बोलताना नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. देवेंद्र फडवणीस आणि नितीन गडकरी यांच्यात 36 चा आकडा असल्याचा दावा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलाय.
नागपूर /नांदेड: राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नांदेडमध्ये देगलूर बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात बोलताना नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. देवेंद्र फडवणीस आणि नितीन गडकरी यांच्यात 36 चा आकडा असल्याचा दावा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलाय. नांदेडमध्ये प्रचारसभेत बोलत असताना वडेट्टीवार बोलत होते. फडवणीसची जिरवायची होती बर झालं जिरली अस आपल्याला गडकरींनी सांगितल्याचा दावा मंत्री वडेट्टीवार यांनी केला. तर, नितीन गडकरी यांच्याकडून देखील विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर देण्यात आलंय. वडेट्टीवारांनी बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण करू नये, असा टोला नितीन गडकरींनी लगावला आहे. विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात आपण महाराष्ट्राचे ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांना मी कधीही, कोणतीही गोष्ट गुपचूप सांगितलेली नाही, असं गडकरींच्यावतीनं स्पष्ट करण्यात आलंय.
विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
देवेंद्र फडवणीस आणि नितीन गडकरी यांच्यात 36 चा आकडा असल्याचा दावा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलाय. फडवणीसची जिरवायची होती बर झालं जिरली अस आपल्याला गडकरींनी सांगितल्याचा दावा मंत्री वडेट्टीवार यांनी केलाय.नांदेडमध्ये प्रचारसभेत बोलत असताना वडेट्टीवार बोलत होते. दरम्यान, प्रचारसभेत वडेट्टीवार यांनी केलेलं हे वक्तव्य सभा जिंकण्यासाठी होत की खरच अस काही आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली होती.
वडेट्टीवारांनी बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण करू नये; गडकरींचा जबर टोला
विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात आपण महाराष्ट्राचे ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांना मी कधीही, कोणतीही गोष्ट गुपचूप सांगितलेली नाही. वडेट्टीवारांनी तशी वक्तव्ये करून बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण करू नये, असा टोला केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी लगावला आहे. फडणवीस यांच्या विरोधात गडकरी यांनी आपल्याला गुपचूप काही तरी सांगितले, असे जे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले. त्यांच्या भाषणाची क्लिप पाहून मला आश्चर्य वाटले. त्यांचे वक्तव्य पूर्णतः निराधार, खोटे आणि बेजबाबदारपणाचे आहे.
LIVE: देगलूर-बिलोली पोटनिवडणुक, महाविकास आघाडीची जाहीर सभा https://t.co/FY2n2pOrZU
— Ashok Chavan (@AshokChavanINC) October 21, 2021
देवेंद्र माझ्या धाकट्या भावासारखे
देवेंद्र फडणवीस माझ्यासाठी धाकट्या भावासारखे आहेत. शिवाय, ते माझ्या पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत. एकमेकांच्या विरोधात काड्या करणे आणि एकमेकांची जिरवणे ही काँग्रेसची परंपरा आहे. त्यामुळे तशा प्रकारचा संभ्रम काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार आमच्याही बाबतीत निर्माण करू पाहतात, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.
इतर बातम्या:
मेळावे आणि चित्रा वाघांना प्रत्युत्तर यापलीकडे चाकणकरांनी महिलांसाठी काय केलं? शालिनी ठाकरेंना सवाल
‘रामायणा’तील आणखी एका पात्राने घेतला जगाचा निरोप, ‘निषाद’ साकारणाऱ्या चंद्रकांत पंड्यांचे निधन
Nitin Gadkari gave answer to Vijay Wadetiiwar claim about differences in Devendra Fadnavis and them