Nitin Gadkari : नितीन गडकरींना राज्यातील सर्वपक्षीय खासदारांची घेतली बैठक, मतदारसंघातील मोठ्या रस्त्यांच्या संदर्भात चर्चा
संबंधित खासदारांच्या मतदारसंघात कोणती रस्त्याची कामं रखडली आहेत. त्यात काय त्रृटी आहे. याचाही त्यांनी आढावा घेतला.
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक घेतली. मतदारसंघातील मोठ्या रस्त्याच्या संदर्भात बैठक घेतली. ज्या मतदारसंघात राष्ट्रीय महामार्ग जातायेत त्यांची स्थिती अथवा नव्याने करायच्या असलेल्या मार्गाबाबत आढावा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदारही या बैठकीत सहभागी झाले होते. संसदेतील कार्यालयात ही बैठक घेतली. शिरूर लोकसभा (Shirur Lok Sabha) मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गाबाबत (National Highways) अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) गडकरी यांना निवेदन दिलं. नितीन गडकरी यांच्याकडं गेल्यानंतर ते कोणाचही काम करतात साऱ्यांचा, असा अनुभव आहे. त्यामुळं ते भाजपचे नेते असले, तरी सर्व पक्षांमधील नेते त्यांना मानतात. बहुतेक सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत नितीन गडकरी यांचे चांगले संबंध आहेत. खासदार हे लोकांचं प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळं लोकांची कामं झाली पाहिजे, असं गडकरींना वाटतं. त्यामुळंच त्यांनी सर्वपक्षीय खासदारांची बैठक बोलावली. त्यांच्या बैठकीला महाराष्ट्रतील बहुतेक सर्व पक्षांचे खासदार उपस्थित होते.
सर्वपक्षीय खासदारांना एकत्र बोलावलं
गडकरी सध्या केंद्रात मंत्री आहेत. त्यांच्याकडं असलेल्या खात्याचा राज्यात सर्वत्र उपयोग व्हावा, हाही यामागचा त्यांचा उद्देश असावा. त्यामुळंच त्यांनी सर्वपक्षीय खासदारांना एकत्र बोलावले. त्यांच्याशी चर्चा केली. या बैठकीतून राज्यात कोणत्या मतदारसंघात रस्त्याची कोणती कामं करायची आहेत, याचा आढावा घेतला. ही सर्व कामं मार्गी लागतील, असं आश्वासनही गडकरी यांनी संबंधित खासदारांना दिल्याची माहिती आहे.
राज्यातील रस्त्यांच्या कामांना गती येणार
संबंधित खासदारांच्या मतदारसंघात कोणती रस्त्याची कामं रखडली आहेत. त्यात काय त्रृटी आहे. याचाही त्यांनी आढावा घेतला. शिवाय आणखी कोणते महत्वाचे रस्ते करता येईल. यासंदर्भात संबंधित खासदारांशी चर्चा केली. यामुळं राज्यातील रस्तांच्या कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.