“नितीन गडकरी ब्रिलियंट माणूस, दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात”

नितीन गडकरी हा ब्रिलियंट माणूस आहे. दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतो, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. बांबू लागवडीला नितीन गडकरी यांनी प्रोत्साहन दिलं आहे

नितीन गडकरी ब्रिलियंट माणूस, दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात
नितीन गडकरी
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 11:49 AM

परभणी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari ) हे तीन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. नांदेड, हिंगोलीनंतर आज ते परभणीत आहेत. राज्यपाल आज वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील (vasantrao naik agriculture university)  प्रशासकीय इमारत भवनात येत आहेत. इथे वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचं पूजन करतील. त्यानंतर ते बांबू लागवड प्लॉटला (Bamboo plot) भेट देणार आहेत. शिवाय शेतीविषयक अवजारांची पाहणीही ते करणार आहेत. यावेळी राज्यपालांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं तोंडभरुन कौतुक केलं.

नितीन गडकरी हा ब्रिलियंट माणूस आहे. दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतो, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. बांबू लागवडीला नितीन गडकरी यांनी प्रोत्साहन दिलं आहे. त्यामुळे त्याचा उपयोग करून घ्या, असा सल्ला कोश्यारींनी विद्यापीठाच्या कुलगुरुंना दिला.

बांबू लागवडीची पाहणी करताना राज्यपालांनी नितीन गडकरींवर स्तुतीसुमनं उधळली. याशिवाय राज्यपालांनी विद्यापीठात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सल्ला दिला. पंतप्रधान म्हणतात ‘सब का साथ सब का विकास’ और सबका विश्वास’, याप्रमाणे सगळ्यांनी एकत्रित राहा, असं राज्यपाल विद्यार्थ्यांना म्हणाले.

VIDEO : राज्यपालांकडून नितीन गडकरींचं कौतुक

राज्यपालांकडून विकासकामांचा आढावा

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे काल हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते. संविधानाने मला जे अधिकार बहाल केले आहेत त्या अधिकारांचा वापर करून मी या जिल्ह्यात आलो आहे, असं ते म्हणाले. त्यांनी सर्व कार्यालयीन प्रमुखांची बैठक घेत जिल्ह्यातील सोयी सुविधा, सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली.

राज्यपालांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात  

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील 3 गाड्यांचा काल किरकोळ अपघात झाला. राज्यपाल कोश्यारी काल हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी नरसी नामदेवकडे जाताना त्यांच्या ताफ्यातील 3 गाड्यांना अपघात झाला. या अपक्षातात 3 गाड्यांचं किरकोळ नुकसान झालं. दरम्यान, या अपघातात कुणालाही गंभीर इजा झाली नाही.

संबंधित बातम्या  

Breaking : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील 3 गाड्यांचा अपघात

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.