अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्री ठरला नाही, देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री : नितीन गडकरी

जेवढी माझी माहिती आहे, त्यानुसार अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्री ठरला नाही, असं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari on BJP formula) यांनी म्हटलंय.

अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्री ठरला नाही, देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री : नितीन गडकरी
Follow us
| Updated on: Nov 08, 2019 | 1:06 PM

मुंबई : “गरज पडल्यास मी मध्यस्थी करायला तयार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल. जेवढी माझी माहिती आहे, त्यानुसार अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्री ठरला नाही”, असं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari on BJP Shiv Sena formula) यांनी म्हटलंय. ते (Nitin Gadkari on BJP Shiv Sena formula) मुंबईत बोलत होते.

जेव्हा बाळासाहेब होते तेव्हादेखील ज्यांचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असे असायचे, असं म्हणत नितीन गडकरी यांनी भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असं एकप्रकारे जाहीर केलं आहे. अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर भाजपा हायकमांडचा नकार कायम आहे. त्यामुळे आता नितीन गडकरी हे स्वत: उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे.

आम्हाला मध्यस्थीची गरज नाही : संजय राऊत

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. “नितीन गडकरी मुंबईचे रहिवासी आहेत, त्यांचं घर वरळीत आहे, ज्यांचं घर मुंबईत आहे त्यांनी मुंबईला येणं ही काही बातमी नाही. नितीन गडकरींकडे मुख्यमंत्रिपदाबाबत कुठलं लिखित पत्र असेल तर मला सांगावं, मी उद्धव ठाकरेंना कळवतो. आम्हाला कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. उद्धव ठाकरे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. तिसऱ्या व्यक्तीने मध्ये पडण्याचं कारण नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेना आमदाराला भाजपकडून 50 कोटींची ऑफर : वडेट्टीवार

शिवसेनेच्या आमदाराला भाजपने 50 कोटींची ऑफर दिली, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. काँग्रेसच्या आमदारांशीही भाजपने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar on BJP Offer) दिली.

संबंधित बातम्या 

फोडाफोडीची भीती, महाराष्ट्रातील आमदारांना काँग्रेसने सत्ता असलेल्या राज्यात हलवलं!  

पडद्यामागे कर्नाटक पॅटर्न राबवण्याचा भाजपचा डाव : संजय राऊत 

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.