भाजप- शिवसेनेच्या विचारधारेत आजही फरक नाही : नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari on Maharashtra govt formation ) यांनी महाराष्ट्रात स्थापन होत असलेल्या महासेनाआघाडीच्या सरकारवर टीकास्त्र सोडलं.
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari on Maharashtra govt formation ) यांनी महाराष्ट्रात स्थापन होत असलेल्या महासेनाआघाडीच्या सरकारवर टीकास्त्र सोडलं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारधारेत मतभिन्नता आहे, त्यामुळे हे सरकार स्थापन जरी झालं तरी ते टिकणार नाही, असं नितीन गडकरी (Nitin Gadkari on Maharashtra govt formation) म्हणाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी ही संधीसाधू आघाडी आहे. ही आघाडी महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ शकणार नाही, असंही नितीन गडकरी म्हणाले.
याशिवाय नितीन गडकरी यांनी “भाजप आणि शिवसेनेची युती ही हिंदुत्वावर आधारीत होती. आजही आमच्या विचारधारेत फरक नाही. अशी युती तोडणं हे देशाचंच नाही तर हिंदुत्वाचंही नुकसान आहेच, शिवाय महाराष्ट्राचंही मोठं नुकसान आहे” असं म्हटलं.
Union Minister Nitin Gadkari: BJP and Shiv Sena alliance was based on ideology of Hindutva and even today we don’t have much ideological differences. Breaking of such an alliance is not only a loss to the country but also to Hindutva cause and to Maharashtra. pic.twitter.com/pfanz27IGp
— ANI (@ANI) November 22, 2019
अस्थिर सरकार आल्यास महाराष्ट्राचं सर्वाधिक नुकसान होईल, नवं सरकार स्थिर राहणार नाही, हे सरकार महाराष्ट्राच्या भल्याचं नाही, असा दावा नितीन गडकरी यांनी केला.
#WATCH: Union Minister Nitin Gadkari says,”This (Shiv Sena-NCP-Congress) is an alliance of opportunism, they will not be able to give Maharashtra a stable Government.” pic.twitter.com/C4VmSaxmnG
— ANI (@ANI) November 22, 2019
भाजपकडून शिवसेनेला पुन्हा ऑफर?
भाजपने एक पाऊल मागे घेत शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याची तयारी दाखवल्याचं वृत्त ‘लोकसत्ता’ दैनिकाने दिलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकत्र येत ‘महासेनाआघाडी’च्या वतीने सत्तास्थापनेचा दावा करण्याची अंतिम जुळवाजुळव केली असतानाच भाजपने प्रस्ताव देण्याची खेळी (BJP offer to Shivsena) केली आहे. त्यामुळे शिवसेनाच पेचात अडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं नमूद केलं.
भाजपने आता मुख्यमंत्रिपदच काय, इंद्राचं आसन दिलं तरी नको : संजय राऊत
“आता कोणी इंद्राचं आसनही दिलं, तरी आम्हाला नको”, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपशी जुळवून घेण्याचे सर्व मार्ग शिवसेनेने बंद केल्याचे संकेत दिले आहेत (Sanjay Raut On BJP’s CM Offer). तसेच, पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद एक शिवसैनिकच भूषवेल असंही त्यांनी सांगितलं.
“महाराष्ट्रात येत्या एक-दोन दिवसांत नवीन सरकार स्थापन होईल आणि त्या सरकारचं नेतृत्त्व शिवसेना करेल. हे मी गेल्या 20-22 दिवसांपासून सतत सांगत आलो आहे. आता अखेर ती वेळ आली आहे, जेव्हा देशाची जनता पाहील, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर एक शिवसैनिक विराजमान होईल. हे उद्धव ठाकरे यांनीही नेहमी सांगितलं की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर एक शिवसैनिकच बसेल, येणाऱ्या दोन दिवसांमध्ये त्याचा निर्णय होईल”, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या
ना आदित्य, ना उद्धव ठाकरे, ‘या’ नेत्याला मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती
भाजपने आता मुख्यमंत्रिपदच काय, इंद्राचं आसन दिलं तरी नको : संजय राऊत