Nitin Gadkari Raj Thackeray Visit: घराबाहेर येताच गडकरी म्हणतात, ‘भेट राजकीय नाही’ पण मग टायमिंगचं काय?

रविवारी अचानक आपल्या दौऱ्यात बदल करून नितीन गडकरी (Nitin Gadkari) राज ठाकरेंच्या भेटीला राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर शिवतीर्थावर नेमकी चर्चा काय? ही मनसे भाजपच्या युतीची चर्चा (Mns Bjp Alliance) आहे का? असे अनेक सवाल राजकारणात विचारले जाऊ लागले.

Nitin Gadkari Raj Thackeray Visit: घराबाहेर येताच गडकरी म्हणतात, 'भेट राजकीय नाही' पण मग टायमिंगचं काय?
नितीन गडकरी-राज ठाकरे यांच्या भेटीवर गडकरींची पहिली प्रतिक्रियाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 1:21 AM

मुंबई : गुढी पाडव्याचा शनिवार तर राज ठाकरेंनी (Raj Thackeray) गाजवलाच, मात्र रविवारही राज ठाकरेंनीच गाजवला. कारण रविवारी अचानक आपल्या दौऱ्यात बदल करून नितीन गडकरी (Nitin Gadkari) राज ठाकरेंच्या भेटीला राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर शिवतीर्थावर नेमकी चर्चा काय? ही मनसे भाजपच्या युतीची चर्चा (Mns Bjp Alliance) आहे का? असे अनेक सवाल राजकारणात विचारले जाऊ लागले. या भेटीचा सस्पेन्स एकाद्या कथानकाला लाजवेल एवढा वाढला. त्यावर भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. भाजप नेत्यांचे सूर तर शनिवारच्या राज ठाकरेंच्या भाषणानंतरच बदलले आहेत. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या भेटीवर टीकेची झोड उडवली. नितीन गडकरी आणि राज ठाकरे हे दोघेही चांगले मित्र आहे. हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र शनिवारी राज ठाकरेंनी महाविकास आघाडी तयार झाल्यावरून सरकार स्थापनेच्या अडीच वर्षानंतर सडकून टीका केली. त्यानंतर मात्र ही भेट केवळ स्नेह भेट राहिली नाही. या भेटीबाबत खुद्द नितीन गडकरी यांनीही भाष्य केलं आहे.

काय म्हणाले नितीन गडकरी?

या भेटीबाबत बोलताना नितीन गडकरी म्हणाले, ही राजकीय भेट नव्हती. माझे राज ठाकरे आणि त्यांच्या परिवाराशी गेल्या अनेक वर्षांपासून संबंध आहेत. त्यांच्या आईची प्रकृती बघायची होती. तसेच त्यांनी नवीन घर पहायला मला बोलवलं होतं. म्हणून मी आज त्यांच्याकडे भेटायला आलो. परवा मंगेशकरांना जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा ते म्हणाले एकदा घरी या. घर आम्ही नवीन बांधलंय तेही बघाल आणि आईशीही भेट होईल, म्हणून मी त्यांना भेटायला आलो. या भेटीचा राजकारणाशी काहीच संबंध नाही. ही पूर्णपणे व्यक्तीगत आणि पारिवारीक भेट होती. त्यांचे माझे संबंध गेल्या तीस वर्षांपासून आहेत. त्यामुळे आजच्या भेटीचा राजकारणाशी कुठलांही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया भेटीनंतर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी दिली आहे. नितीन गडकरी जरी ही भेट राजकीय नसल्याचे सांगत असले तरी या भेटीचं टायमिंग आणि राज ठाकरेंनी शिवतीर्थावर घेतलेली भूमिका पाहता, अनेकांना ही मनसे-भाजपच्या युतीची सुरूवात वाटू लागली आहे.

भाजप नेते म्हणतात…

मात्र या भेटीबाबत भाजप नेत्यांना विचारले असता, अशा भेटी फक्त वयक्तीक भेटी नसतात. अशा भेटीत ही राजकीय चर्चा ही होतच असते. त्यामुळे भविष्यात भाजप आणि मनसेची सकारात्मक चर्चा होऊ शकते. कारण राज ठाकरेंनी शिवतीर्थावर हिंदुत्वाची घेतलीली भूमिका ही आमच्याशी जुळणारी भूमिका आहे. अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. तर या भेटीबाबत सुधीर मुनगंटीवार यांना विचारले असता. भविष्यात मनसेसोबत युतीचा प्रस्ताव आल्यास त्याबाबत आमच्या कोर कमिटीत चर्चा होईल, मगच काय तो निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच शिवसेनेबरोबर भविष्यात युती होणार नाही म्हणत त्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र या भेटीवर सडकून टीका केली आहे.

Nitin Gadkari Raj Thackeray meet : राज ठाकरे-नितीन गडकरींच्या भेटीवर भाजप नेते म्हणतात हिंदुत्वाबाबत ठोस भूमिका घेतल्याने…

राज ठाकरेंच्या भाषणानं वारं बदललं, नारायण राणे, विनय सहस्त्रबुद्धे यांच्यासह भाजप नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भेटीला नितीन गडकरी, “शिवतीर्थ”वरील भेटीत युतीची चर्चा?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.