ज्यांना मोठं समजत होतो, जवळून पाहिल्यावर ते खूपच खुजे निघाले, नितीन गडकरींच्या वक्तव्याने पुन्हा चर्चा
भाजपचे अध्यक्षपदी असताना तेव्हा दिल्लीत रहावं लागलं होतं. यावेळी उपहासात्मक शैलीत गडकरी म्हणाले, दिल्लीचं पाणी चांगलं नाहीये.
मुंबईः आतापर्यंत ज्यांना मी मोठं समजत होतो, त्यांना जवळून पाहिल्यानंतर खूप लहान वाटले, असं वक्तव्य केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय राजकारणात (Politics) सक्रिय झालेल्या नितीन गडकरी यांनी दिल्लीतील (Delhi) नेत्यांसंदर्भात हे वक्तव्य केलंय का, यावरून चर्चा सुरु झाली आहे.
नितीन गडकरी यांनी केलेलं हे वक्तव्य मुंबईतलं आहे. मुंबई आयआयटीमध्ये गडकरी शनिवारी एका कार्यक्रमाला उपस्थित होते. नेहमीप्रमाणे गडकरी यांनी या भाषणातही तुफान फटकेबाजी केली.
आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नितीन गडकरी यांनी भारतातील मूल्यशिक्षण व्यवस्थेचं कौतुक केलं. शिक्षणासोबतच मूल्य किती आवश्यक असतात, याचं महत्त्व सांगितलं.
पदवी घेतल्यामुळे तुम्ही फक्त सुशिक्षित होता. पण सुसंस्कारी होत नाहीत. संस्कार असले तरच माणसे परस्परांशी चांगले वागतात. राजकारणात ह्युमन रिलेशनशिप अत्यंत महत्त्वाची असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं.
प्रामाणिकपणा हादेखील अत्यंत महत्त्वाचा गुण आहे, असं वक्तव्य गडकरी यांनी केलं. यावेळी त्यांनी दिल्लीतला अनुभव सांगितला. ते म्हणाले, भाजपचे अध्यक्षपद मिळालं तेव्हा मी पहिल्यांदा दिल्लीत गेलो. तोपर्यंत फार कधी गेलो नव्हतो. माझ्या एका मित्राने विचारलं दिल्लीतल्या अनुभवाबद्दल. तेव्हा मी म्हणालो, तिथे खूप मित्र झाले. उद्योगपती, फिल्म अभिनेते, राजकीय नेते…
मी त्याला म्हणालो, दिल्ली का पानी अच्छा नही है.. महाराष्ट्र बहुत अच्छा है… मुंबई बेस्ट है… दिल्ली में बडे होशियारी से काम करना पडता है… होशियारी का मतलब आप समझ लो.. जिन लोगों को मै बहोत बडा समज रहा था… उनके नजदीक जाने से पता चला वे बहोत छोटे है… मै जिन को बहोत छोटा समझ रहा था, उन लोगों के नजदीक जाने बात पता चला वो बहोत बडे है.. और छोटे लोग दिखते वे बहुत बडे निकले…
नितीन गडकरी 2009 ते 2013 पर्यंत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते. 1995 ते 1999 पर्यंत ते महाराष्ट्रातील शिवसेना-भाजपा सरकारमध्ये मंत्री पदी होते. तर 2014 पासून ते नरेंद्र मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीपदावर आहेत.
Addressing Alankar 2022 – the annual business festival of Shailesh J. Mehta School of Management, IIT Bombay https://t.co/tpf2vSJwF2
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) October 29, 2022
भाषणादरम्यान, नरेंद्र मोदी यांनी मित्राचा किस्सा सांगितला. मित्राला अनुभवांबद्दल सांगताना ते म्हणाले, मी ज्या लोकांना ताकदवान मानत होतो… पण मी जेवढं समजलं होतं, तेवढे हे नेते प्रभावी नव्हते. ते खुजे निघाले. पण मी ज्यांना लहान समजत होतो, त्यांच्या जवळ गेल्यावर ते किती प्रभावी आहेत, हे समजलं. माझ्या जीवनाचा हा अनुभव आहे….