मुंबई : “देशभरात कोरोनामुळे कोट्यवधी (India corona death) लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना त्याचं सोयरसुतक नाही, नितीन गडकरी पंतप्रधान (Nitin Gadkari Prime Minister) असायला हवं होतं, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी खतांचे वाढलेले दर, चक्रीवादळाने झालेले नुकसान, कोरोना लसीकरण अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. (Nitin Gadkari should by Prime Minister in this corona pandemic instead of Narendra Modi said congress leader Nana Patole )
नितीन गडकरी यांनी कोरोना लसीच्या वाढत्या मागणीवरुन दहा कंपन्यांना लसनिर्मितीची परवानगी देण्याचा सल्ला दिला होता. त्यावरुन नाना पटोले यांनी टोमणा लगावला. नाना पटोले म्हणाले, “मोदींसमोर नितीन गडकरींचं चालतं की नाही ठाऊक नाही, पण आम्हाला वाटतं की नितीन गडकरी हे पंतप्रधान असायला हवे होते. कोटी लोक देशात मरत आहेत, पण मोदींना सोयरसूतक नाही”
भाजपमध्ये मोदींना हटवून गडकरी यांना पंतप्रधान करायचं अशी चर्चा सुरू आहे. आम्हला आनंद आहे की महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होतोय. मी नितीन गडकरी यांच्याविरोधात लढलो त्यावेळी त्यांनी भावी पंतप्रधान म्हणून मतं मागितली होती. म्हणून आनंद आहे, असंही नाना पटोले म्हणाले.
#WATCH | If vaccine demand is more than supply it creates problem. Instead of 1, let 10 more companies be given license for vaccine manufacture…Let them supply in country & later if there’s surplus, they may export. It can be done in 15-20 days: Union Min Nitin Gadkari (18.05) pic.twitter.com/gVOqMuVRNr
— ANI (@ANI) May 19, 2021
केंद्र सरकारने दुसऱ्या लाटेकडे लक्ष दिलं नाही. उलट कोरोना संपला असं सांगण्यात आलं. त्याचे परिणाम काय झाले हे आपण पाहिलं, असा घणाघात नाना पटोले यांनी केला. कोरोना माहामारीत लोकांचा जीव गेला, शेतकऱ्यांचं नुकसान झालं. शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतमाालाला दाम दुप्पट देऊ असं मोदी म्हणाले पण आज शेतकऱ्यांना वस्तूस्थिती समजली, असं नाना पटोले म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौरा करत आहेत. मात्र चक्रीवादळाने महाराष्ट्रातही नुकसान झालं आहे. त्यांनी महाराष्ट्रातही यायला पाहिजे होतं. प्रशासनावर ताण येऊ नये म्हणून त्यांची भूमिका असेल तर ती चांगली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कंट्रोलरुममधून परिस्थिती हाताळत आहेत. प्रशासनावर ताण नको म्हणून आम्हीही उशिरा बाहेर पडत आहोत, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनाही नाना पटोले यांनी उत्तर दिलं. उद्या निवडणुका घेतल्या तर मोदी 400 जागा जिंकतील असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर नाना पटोले म्हणाले, तात्काळ निवडणुका घ्या, कुणाला किती जागा मिळतात ते बघाच.
संबंधित बातम्या
एका ऐवजी दहा कंपन्याना कोरोना व्हॅक्सिन बनविण्याचं लायसन्स द्या; नितीन गडकरींचा सल्ला
खत दरवाढीविरोधात काँग्रेसही मैदानात, घंटानाद आंदोलन करू; नाना पटोलेंचा इशारा