Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur : रोडकरी ते नेटकरी, यूट्यूबवरून गडकरी महिन्याला किती कमावतात, माहितेय…!

कुठल्याही व्यक्तीला त्याच्यातील गुण आणि दोषासह स्विकारले जाते. संघामध्ये त्यावर असे संस्कार होतात की अमूलाग्र बदल करुनच तो आपल्या जीवनाचा मार्गक्रमण करीत असतो.

Nagpur : रोडकरी ते नेटकरी, यूट्यूबवरून गडकरी महिन्याला किती कमावतात, माहितेय...!
केंद्रीय मंत्री नितीन गडकरीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 23, 2022 | 3:37 PM

गजानन उमाटे प्रतिनीधी नागपूर : सर्वसामान्यांना रुचेल आणि जे आहे ते सडेतोड मत मांडणाऱ्यापैकी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे नाव आघाडीवर आहे. प्रत्येक मनोगतामध्ये राजकीय (Politics) किनार असेलच असे नाही. मात्र, त्यांच्या बोलण्यात विकास कामे आणि जीवनशैली हे दोन मुद्दे आवर्जून असताताच. सोशल मिडिया (Social Media) केवळ करमणूकाचे साधन नाही त्यामधून मिळगत काय होईल असे सांगणारे नितीन गडकरी याच सोशल मिडियातील यूट्यूबवरुन महिन्याला तब्बल अडीच लाख रुपये कमवतात. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या भारत रक्षा या कार्यक्रम बोलत असताना हे सांगितले आहे. त्यामुळे केवळ मार्गदर्शनच नाहीतर त्याची अंमलबजावणी केली तर काय होऊ शकते हे गडकरी यांनी उपस्थितांना पटवून सांगितले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रत्येक कार्यक्रम हे यूट्यूबर अपलोड केले जातात. त्यांची भाषणे सर्वसामान्य नागरिकांनाही अपील करणारी आहेत. त्यामुळे यूट्यूबच्या माध्यमातून त्यांना महिन्याकाठी 2 लाख 50 हजार रुपये मिळत आहेत.

सामाजिक आणि राजकीय काम करीत असताना राष्ट्रवाद हाच सर्वात महत्वाचा आहे. त्यामुळे काम कोणतेही असो आपले उद्दिष्टाचा विसर पडता कामा नये असेही गडकरी म्हणाले आहेत. सर्वप्रथम राष्ट्रहीत आणि त्यानंतर सर्वकाही हेच आपले धोरण असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

कुठल्याही व्यक्तीला त्याच्यातील गुण आणि दोषासह स्विकारले जाते. संघामध्ये त्यावर असे संस्कार होतात की अमूलाग्र बदल करुनच तो आपल्या जीवनाचा मार्गक्रमण करीत असतो. आणि हेच खरे राष्ट्रनिर्माण असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून जागतिक स्तरावर भारताची प्रगती मोठ्या झपाट्याने होत आहे. त्याची प्रचिती आता येऊ लागली असून असेच कार्य कायम ठेवले तर अमूलाग्र बदल होणार आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये भारत देश आघाडीवर असल्याचेही गडकरी म्हणाले आहेत.

मध्यंतरी नितीन गडकरी यांची तब्येत खलावली होती. त्यामुळे ते रोज एक तास प्राणायम करतात. मानवी जीवनात शरीर हीच खरी संपत्ती आहे. पैसे तर मी युट्यूबवरुनही कमावतो. असे सांगत असताना महिन्याकाठी 2 लाख 50 हजार या माध्यमातून मिळत असल्याचे ते म्हणाले आहेत.

कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला.
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा.
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला.
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी.
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.