Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Raut : ज्यांनी बोलायला पाहिजे ते मात्र मोदींचे दास झालेत! नितीन राऊत यांचा आठवले, आंबेडकरांना टोला

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार लोकशाहीचे चार आधारस्तंभ आहेत , ते हलवण्याचे काम सध्या केंद्र सरकारकडून सुरू आहे. मात्र एकही नेता यावर बोलण्यासाठी पुढे येत नाही.

Nitin Raut : ज्यांनी बोलायला पाहिजे ते मात्र मोदींचे दास झालेत! नितीन राऊत यांचा आठवले, आंबेडकरांना टोला
नितीन राऊत यांचा आठवले, आंबेडकरांना टोलाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 8:34 AM

जळगाव – देशात दलितांचा धाक राहिलेला नाही. लोकशाहीचे चार आधारस्तंभ आहेत ते हलविण्याची हिंमत केंद्र सरकार करत आहे. मात्र या विरोधात बोलण्यासाठी एकही नेता पुढे येत नाही. ज्यांनी बोलायला पाहिजे ते मात्र मोदींचे दास झाले आहे असे म्हणत राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) आणि आंबेडकरी समाजाचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना टोला लगावला आहे. भुसावळ शहरात भीम गीतांचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी उपस्थिती लावली.

नितीन राऊत यांचा आठवले, आंबेडकरांना टोला

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार लोकशाहीचे चार आधारस्तंभ आहेत , ते हलवण्याचे काम सध्या केंद्र सरकारकडून सुरू आहे. मात्र एकही नेता यावर बोलण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे दलितांच्यासोबत आंबेडकरी समाजचेही दुर्लक्ष होत आहे. मात्र स्वतः ला आंबेडकरी समाजाचे प्रतिनिधी समजणारे आज मोदींचे दास झाले आहेत. नावात राम आहे मात्र कार्यातून ते दास असल्याचे म्हणत नाव न घेता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्यावर टीका केली. तर नावात प्रकाश आहे, मात्र ऊर्जा त्यांना आंबेडकरांकडून मिळाली असे म्हणत नाव न घेता प्रकाश आंबेडकर यांनाही टोला लगावला.

हे सुद्धा वाचा

नितीन राऊत यांनी लुटला भीम गीतांचा मनमुराद आनंद

जळगावात प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या आवाजात भीम गीतांचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची उपस्थिती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सुरवाडे यांच्यातर्फे भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या अनोख्या बहारदार शैलीत भीमगितांचे गायन करत आनंद शिंदे यांनी यावेळी उपस्थितांची मने जिंकली.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.