NMC Election 2022: नागपूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 27 मध्ये भाजपचा दबदबा! जागा राखण्याचं आव्हान
वॉर्ड 27 मधून 2017 च्या निवडणुकीत भाजपचे तीन नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेसचा एकच उमेदवार निवडून आला होता.
नागपूर : नागपूर महापालिकेवर 2017 साली भाजपनं झेंडा फडकवला. भाजपच्या नगरसेवकांनी बहुमतापेक्षा (Majority) जास्त जागा जिंकत आपला दबदबा नागपूरमध्ये कायम ठेवला. गेल्या 15 वर्षांपासून भाजपची सत्ता नागपुरात आहे. नगरसेवकांचा (Corporator) कार्यकाळ संपल्यानं आयुक्तांकडं प्रशासक (Administrator) म्हणून जबाबदारी आहे. वॉर्ड क्रमांक 27 मधून चारपैकी तीन जागा भाजपनं जिंकल्या होत्या. यावेळी सीमांकन बदललं. वॉर्ड 27 मधून तीन उमेदवार निवडून येणार आहेत. 2022 च्या निवडणुकीत नेमकं काय घडतं, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. त्यातच पालिकेच्या रचनेत बदल झालाय. वॉर्डाची संख्या आरक्षण यात बदल झालाय.
गेल्या निवडणुकीचे विजेते कोण?
वॉर्ड 27 मधून 2017 च्या निवडणुकीत भाजपचे तीन नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेसचा एकच उमेदवार निवडून आला होता. दिव्या धुरडे, वंदना भुरे, हरीश दिकोंडवार हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. तानाजी वनवे हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. वनवे यांना 11 हजार 458 मतं मिळाली होती. धुरडे यांना 14 हजार 481 मतं मिळाली होती. भुरे यांनी 12 हजार 802 मतं प्राप्त केली होती. दिकोंडवार यांनी 11 हजार 775 मतं प्राप्त केली होती.
वॉर्डाची व्याप्ती आणि आरक्षण
वॉर्ड 27 ची लोकसंख्या 47 हजार 8 आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या 9 हजार 183 आहे. अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1 हजार 492 आहे. या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 27 साठी अ अनुसूचित जाती महिला, ब सर्वसाधारण महिला व क सर्वसाधारण गटासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. वॉर्ड क्रमांक 27 ची व्याप्ती खालील प्रमाणे आहे. वर्धमाननगर, पूर्व वर्धमाननगर, आदर्शनगर, हिवरीनगर, देशपांडे लेआऊट, त्रीमूर्तीनगर, बाबूळबन, शास्त्री नगर, वाठोडा गाव, ट्रान्सपोर्टनगर, सालासारनगर, घरसंसार सोसायटी, उमेया कॉलनी, कामाक्षीनगर, वैदभूमी सोसायटी, कावरे लेआऊट, सदाशिवनगर. नागभीड रेल्वे लाईन वरील डिप्टी सिग्नल रेल्वे क्रॉसिंगपासून आग्नेय दिशेने जाणाऱ्या मार्गाने सेंटर पॉइंट शाळेजवळील नागभीड रेल्वे मार्गाच्या नाग नदीपर्यंत रेल्वे पुलापर्यंतचा भाग.
नागपूर महापालिका 2022 प्रभाग क्रमांक 27 अ
पक्ष | उमेदवार | विजयी आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
काँग्रेस | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
बसपा | ||
इतर |
नागपूर महापालिका 2022 प्रभाग क्रमांक 27 ब
पक्ष | उमेदवार | विजयी आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
शिवसेना | ||
बसपा | ||
इतर |
नागपूर महापालिका 2022 प्रभाग क्रमांक 27 क
पक्ष | उमेदवार | विजयी आघाडी |
---|---|---|
भाजपा | ||
काँग्रेस | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
बसपा | ||
इतर |