Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NMMC Election 2022 : नवी मुंबईचा प्रभाग 23 कुणाचा? शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपात मुख्य लढत

शिवसेनेतर्फे मागील वेळी उमेदवार विजयी झाला होता. मात्र यावेळी शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. एक मूळ शिवसेना तर दुसरा शिंदे गट. स्थानिक पातळीवर शिवसैनिक कोणाच्या बाजूने राहतात, यावर शिवसेनेचे भवितव्य अवलंबून असेल.

NMMC Election 2022 : नवी मुंबईचा प्रभाग 23 कुणाचा? शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपात मुख्य लढत
नवी मुंबई महापालिका, वॉर्ड 23Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 7:30 AM

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी (NMMC Election 2022) राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. महापालिकेची मुदत मे 2020मध्येच संपली. मात्र कोविड लाटेमुळे निवडणूक होऊ शकली नाही. याठिकाणी प्रशासक राज आहे. आता यंदा ही निवडणूक होणार आहे. 41 प्रभागांतून 122 जागांसाठी निवडणूक होणार आहे. मागील वेळेपेक्षा यावेळी जागा वाढल्या आहेत. तर तीन सदस्यीय अशी प्रभागांची रचना आहे. आरक्षणही बदलले आहे. त्यामुळे इच्छुकांची पळापळ होत आहे. प्रभाग 23मध्ये मागील वेळी शिवसेनेचा (Shivsena) उमेदवार विजयी झाला होता. यावेळी प्रभागांची रचना पूर्णपणे बदलली आहे. त्यामुळे विजय कोणाच्या पारड्यात पडतो, त्याची उत्सुकता आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने होत आहे. याआधी येथील निवडणूक सलग सहावेळा वॉर्ड पद्धतीनेच झाली होती. एक वॉर्ड एक नगरसेवक (Corporator) अशा पद्धतीची ही निवडणूक होती.

प्रभागातील व्याप्ती कशी?

प्रभाग 23ची तुर्भे स्टोअर भाग, इंदिरानगर, गणपतीपाडा, पावणे गाव, एमआयडीसी क्षेत्र आणि इतर अशी व्याप्ती असून महापे पोलीस चौकी, शीळफाटा, महापालिकेच्या डोंगराकडूल पूर्व हद्द, मातोश्री मेडिकल, श्रीगणेश क्लिनिक, डंपिंग ग्राऊंड, सनवेल ऑइल कंपनी ऑफ इंडिया, महाराष्ट्र सोप वर्क प्रा.लि. आदी परिसर येतो.

लोकसंख्येचे गणित

प्रभाग क्रमांक 23मधील एकूण लोकसंख्या 30,894 इतकी आहे. यात अनुसूचित जातीची एकूण लोकसंख्या 4100 इतकी असून अनुसूचित जमाचीची लोकसंख्या 357 एवढी आहे.

हे सुद्धा वाचा

कोण मारणार बाजी?

शिवसेनेतर्फे मागील वेळी उमेदवार विजयी झाला होता. मात्र यावेळी शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. एक मूळ शिवसेना तर दुसरा शिंदे गट. स्थानिक पातळीवर शिवसैनिक कोणाच्या बाजूने राहतात, यावर शिवसेनेचे भवितव्य अवलंबून असेल. तर इतर पक्ष आपापल्या विजयासाठी प्रयत्न करतील.

विजयी उमेदवार (2015)

ममित चौगुले – शिवसेना

प्रभाग 23 (A)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग 23 (B)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग 23 (C)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

आरक्षण कसे?

प्रभाग 23चे आरक्षण मागील वेळेपेक्षा पूर्णत: बदलले आहे. तीन सदस्यीय वॉर्डरचना असणार आहे. त्यानुसार 23 अ हा अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव असणार आहे. ब हा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी तर क हा सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.