अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड होणे अशक्य?, नेमके कारण काय?

| Updated on: Feb 25, 2021 | 3:38 PM

मार्च महिन्यातील 1 तारखेला होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड होण्याची शक्यता धुसर आहे. (state assembly president election budget session)

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड होणे अशक्य?, नेमके कारण काय?
विधानभवन
Follow us on

मुंबई : मार्च महिन्यातील 1 तारखेला होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (budget session) विधानसभेच्या (state assembly) अध्यक्षपदाची (president) निवड होण्याची शक्यता धुसर आहे. राज्यात वाढलेला कोरोना संसर्ग तसेच मंत्री आणि आमदार यांना कोरोनाची झालेली लागण यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक होणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. (no chance of state assembly president election in budget session

विधानसभा अध्यक्षांची निवड होणे शक्य नाही

आगामी 1 मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात विधानसेच्या अध्यक्षांची निवड होणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यावेळी अनेक मंत्री आणि अमदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ते अधिवेशनाला हजर राहू शकत नाहीत. त्यांना मतदान करता येणार नाही. त्यामुळे या कारणामुळे अध्यक्षपदाची निवडणूक लांबवणीवर पडू शकते. तशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुढच्या अधिवेशनात अध्यक्षांची निवड होणार

सध्या राज्यातील बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये महाविकास आघाडीतील अनेक मंत्री आणि आमदारांचा समावेश आहे. सध्या राज्य मंत्रिमंडळातील अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, जलसंपदामंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू या नेत्यांचा कोरोनाची लागण झाली आहे. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख आणि अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे हे नुकतेच कोरोनामुक्त झाले आहेत. या सर्व मंत्र्यांना अधिवेशनात सहभागी होता येणार नाही. त्यामुळे या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निडणूक होणे शक्य नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, असे असले तीर आगामी पावसाळी अधिवेशनात नव्या अध्यक्षांचनी निवड केली जाऊ शकते, तसा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

विधानसभा अध्यक्षांचं काम काय?

विधानसभा अध्यक्ष हे विधानमंडळ आणि विधानसभा सचिवालयाचे प्रमुख, पीठासीन अधिकारी असतात. विधानसभा अध्यक्षांना घटना, कार्यपद्धती, नियम आणि संसदीय परंपरांच्या अंतर्गत व्यापक अधिकार आहेत.

विधानसभा अध्यक्षांची निवड सदस्यांद्वारे मतदान प्रक्रियेद्वारे होते. सत्ताधारी आणि विरोधीपक्षाकडून उमेदवार विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करतात.

सदनाच्या आवारात विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च अधिकार असतात. विधानसभेची व्यवस्था टिकवून ठेवणे ही त्यांची जबाबदारी आहे आणि विधानसभेतील सदस्यांनी नियमांचे पालन केले आहे, की नाही यावर ते देखरेख करतात.

सभागृहातील सर्व सदस्यांनी विधानसभा अध्यक्षांचं म्हणणं आदरपूर्वक ऐकणं अपेक्षित असतं. ते सभागृहाच्या चर्चेत सहभाग घेत नाहीत, परंतु ते विधानसभेच्या कामकाजादरम्यान आपला निर्णय देतात. विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष कामकाज पाहतात.

दरम्यान, राज्यात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, वाढीव वीजबिल हे मुद्दे ऐरणीवर आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या 1 मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशन घेतले जाणार आहे. त्यामुळे या अधीवेशनात काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

इतर बातम्या :

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण आत्महत्येचे, गुन्हा मानूनच तपास सुरु : पोलीस महासंचालक

Washim Corona Updates : पोहरादेवीच्या महंतासह कुटुंबातील पाच जण कोरोना पॉझिटिव्ह

VIDEO : काढून टाका ते, संभाजी भिडेंनी सेना आमदाराला मास्क काढायला लावला